काही दिवसांपूर्वीच राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना (Ladki Bahin Yojana) सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत राज्यातील लाखो महिलांना प्रतिमहिना 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. आता पुढील दोन महिन्यांचे पात्र महिलांच्या बँक खात्यावर एकदाच 3000 रुपये जमा होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी केली आहे. या आर्थिक मदतीसाठी महिलांनी आपल्या बँक खात्याची केवायसी पूर्ण केली आहे का, तसेच आधार क्रमांक बँक खात्यास जोडला आहे का, हे तपासून घेण्याच्या सूचना देखील दिल्या गेल्या आहेत.
सणासुदीच्या या काळात, नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच दिले जाणार आहेत. अजित पवार यांनी याबाबत सांगितले की, भाऊबीजच्या निमित्ताने नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये ऑक्टोबर महिन्यातच दिले जातील. यामुळे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना ऑक्टोबरमध्ये एकूण 3000 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे महिलांना सणांच्या काळात या आर्थिक मदतीचा मोठा लाभ होणार आहे.
या संदर्भात अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की, या 3000 रुपयांचे पैसे महिलांच्या बँक खात्यावर येत्या 10 ऑक्टोबरपर्यंत जमा होणार आहेत. म्हणजेच, अवघ्या सहा ते सात दिवसांच्या आत ही रक्कम महिलांना मिळणार आहे. आतापर्यंत ‘लाडकी बहीण’ योजनेंअंतर्गत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांचे तीन हप्ते महिलांना देण्यात आले आहेत. जुलै महिन्यातील मदत ऑगस्टमध्ये वितरित करण्यात आली, तर काही कागदपत्रांच्या त्रुटीमुळे पैसे न मिळालेल्या महिलांना सप्टेंबरमध्ये दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये मिळाले. त्यामुळे आता ऑक्टोबर महिन्यातील 3000 रुपयांचा लाभ महिलांना मिळणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना आवश्यक कागदपत्रांची तयारी करावी लागेल, कारण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या बँक खात्यांवर येणाऱ्या आर्थिक मदतीसाठी आवश्यक प्रक्रिया महत्त्वाची आहे. या योजनेमुळे अनेक महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल होण्यास मदत होईल, याबद्दल सरकारने आशा व्यक्त केली आहे.