विधानसभा निवडणूक (Vidhansabha Elections 2024 ) तोंडावर आल्या असताना अनेक घटना घडत आहेत. अस असतानाच आता बिहारमधून (Bihar) एक घटना समोर आलेली आहे. बिहारच्या रस्त्यांवर सध्या अनेक पोस्टरच दिसत आहेत.राजधानी पटणा येथील जेडीयूच्या प्रदेश कार्यालयाबाहेरील या पोस्टरच्या माध्यमातून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांना भारतरत्न देण्याची मागणी जनता दल युनायटेडच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. हे पोस्टर जेडीयू नेते छोटू सिंह यांनी लावले आहेत असे म्हटले जात आहे.
आज पक्ष कार्यालयात राज्य कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक JDU ने बोलाविलेली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार हे या बैठकीचे अध्यक्ष आहेत. परंतु ही बैठक पार पडण्याआधीच पटणाच्या रस्त्यांवर विविध पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत. या पोस्टरवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या फोटोसोबत जेडीयूच्या सर्व बड्या नेत्यांचे फोटोही लावण्यात आलेले आहेत. या पोस्टरमध्ये केंद्रीय मंत्री लालन सिंह, बिहार सरकारचे मंत्री विजेंद्र यादव, विजय चौधरी, अशोक चौधरी, आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष उमेश कुशवाह यांचे देखील फोटो लावलेले आहेत.
“शीख समुदायाचे लोक नितीश कुमार यांचे कौतुक करत असून त्यांनी जगभरात नाव कमावले आहे. नितीन कुमार यांचे आणि त्यांच्या कामाचे अमेरिका, ब्रिटन, कॅनडा सर्वांनीच कौतुक केले आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी केलेले काम ऐतिहासिक आहे.यामुळे त्यांना भारतरत्न मिळावा. गरज पडल्यास आम्ही दिल्लीत जाऊन आमच्या मागण्या मांडू,” असे भाष्य सरचिटणीस छोटू सिंह यांनी केलेले आहे.
दरम्यान, आगामी 2025 च्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर JDU ने बोलविलेली बैठक अतिशय महत्वाची मानली जात आहे. 2010 पेक्षा जास्त जागा या निवडणुकीत मिळू शकतात असा दावा जेडीयू नेत्यांकडून करण्यात येत आहे.