आज भारतीय वायुसेना (Air Force Day) 92 वा वर्धापनदिन साजरा करत आहे. या निमित्ताने भारतीय वायुसेनेकडून भारतीय वायु सेना ‘शक्तिशाली, सामर्थ्यवान आणि आत्मनिर्भर’ या थीमसह हा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. वायुसेना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) देखील हवाई योद्ध्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर याबाबत पोस्ट केलेली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की,”आमच्या शूर हवाई योद्ध्यांना वायुसेना दिनाच्या शुभेच्छा. आपल्या देशाच्या संरक्षणातील हवाई योद्ध्यांची भूमिका अत्यंत प्रशंसनीय आहे.” तसेच “भारतीय हवाई दल सर्व हवाई योद्धा, DSC कर्मचारी, नागरिक, NCE आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या त्यांच्या कुटुंबियांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांचे धैर्य, वचनबद्धता आणि उत्कृष्टता देशाला सतत प्रेरणा देत आहे” असे देखील पंतप्रधान पोस्टद्वारे म्हणालेले आहेत.
Air Force Day greetings to our brave air warriors. Our Air Force is admired for their courage and professionalism. Their role in protecting our nation is extremely commendable. pic.twitter.com/Qsb8URzmmT
— Narendra Modi (@narendramodi) October 8, 2024
गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी देखील त्यांच्या एक्स अकाऊंटवरुन वायुसेना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमित शाह यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, “भारतीय वायुसेना दिनानिमित्त भारतीय वायुसेनेच्या जवानांना शुभेच्छा. आमच्या हवाई योद्धांचे शौर्य आकाशात गर्जत आहे, त्यांनी आपल्या शौर्याने, देशभक्तीने आणि त्यागाच्या जोरावर प्रत्येक क्षणी आपल्या राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे रक्षण केले आहे. देशाचे रक्षण करण्यासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना सलाम.”
Greetings to the Indian Air Force personnel on #IndianAirForceDay.
The valour of our air warriors has roared in the skies, safeguarding the sovereignty of our nation every moment with their courage, patriotism, and sacrifice.
Salutes to the Bravehearts who made supreme…
— Amit Shah (@AmitShah) October 8, 2024
दरम्यान, राजकीय वर्तुळातील अनेक नेत्यांनी वायुसेना दिनानिमित्त आयएएफला शुभेच्छा दिलेल्या आहेत. भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या आणि आपत्ती निवारण कार्यात गुंतलेल्या IAF (Indian Air Force ) जवानांच्या शौर्याचा आणि समर्पणाचा सन्मान करण्यासाठी वायुसेना दिन साजरा केला जातो. भारतीय वायुसेनेची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 रोजी झाली होती. तसेच IAF ने अनेक लष्करी ऑपरेशन्स आणि मानवतावादी मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली आहे.