आज हरियाणा(Haryana) विधानसभा निवडणुकीचा (Vidhansabha Elections 2024) निकाल जाहीर होत आहे. आज सकाळपासून विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतमोजणीला सुरुवात देखील झालेली आहे. दरम्यान, हरियाणातील जुलाना विधानसभा मतदारसंघातून कुस्तीपटू विनेश फोगाट(Vinesh Phogat) यांचा विजय झाला आहे. विधानसभा निवडणुकीत जुलाना मतदारसंघातून भाजपकडून योगेश बैरागी (Yogesh Bairagi)उभे राहिले होते. तसेच इंडियन नॅशनल दलने सुरेंद्र लाठर, आम आदमी पार्टीकडून कविता देवी तर एकूण 12 उमेदवार या विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहिले होते. 6015 मतांनी विनेश फोगाट यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळविलेला आहे.
२००५ नंतर म्हणजेच तब्बल 19 वर्षांनी जुलानामधून काँग्रेसला ही जागा मिळालेली आहे. जुलाना मतदारसंघात विनेश फोगाट (Vinesh Phogat) आणि योगेश बैरागी यांच्यात चुरशीची लढत झालेली आहे. या निवडणुकीत योगेश बैरागी यांना 59065 मते तर विनेश फोगाट यांना 65080 मते मिळालेली आहेत. तसेच आम आदमी पक्षाच्या उमेदवार कविता राणी यांना केवळ 1280 मते मिळालेली आहेत.
दरम्यान, कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी विनेश फोगाट यांचे अभिनंदन करतानाची एक्स अकॉउंटवर एक पोस्ट केलेली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणाले आहेत कि, “देशाची कन्या विनेश फोगाटला विजयाबद्दल खूप खूप अभिनंदन. ही लढत केवळ एका पक्षासाठी किंवा एका जुलाना जागेसाठी नव्हती असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटलेले आहे.”
दरम्यान, कुस्तीपटू विनेश फोगाट यांना पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीपूर्वीच बाद करण्यात आले होते. जास्त वजन भरल्याने या खेळासाठी त्या अपात्र ठरल्या होत्या. यानंतर त्यांनी कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती. विनेश फोगाट आणि कुस्तीपटू बजरंग पुनिया या दोघांनी 6 सप्टेंबर रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.