Baba Siddique : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. याप्रकरणी शुक्रवारी आणखी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आत्तापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली असून, सर्वत्र खळबळ उडाली आहे. सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईच्या (Lawrence Bishnoi) टोळीने घेतली असून, या प्रकरणाचा तपास अजून सुरु आहे. सिद्दीकी यांची हत्या कोणत्या कारणावरून करण्यात आली याबाबत अजूनही कोणतीही माहिती समोर आली नसून, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
या प्रकरणी मुंबई पोलिसांनी माहिती देताना सांगितले. ‘क्राईम ब्रँचने रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि कर्जत येथे छापे टाकले आणि या पाच जणांना तेथून अटक करण्यात आली आहे. ज्यांनी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचला होता.
अधिकाऱ्यांनी सांगितले, ‘अटक करण्यात आलेले लोक लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या संपर्कात होते, ज्यांनी बाबा सिद्दीकीच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. ते पुढे म्हणाले, ‘या प्रकरणी आतापर्यंत एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.’
माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्यावर १२ ऑक्टोबर रोजी गेळ्या झाडण्यात आल्या होत्या, यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर काही वेळाने त्यांना जवळच्या लीलावती रुग्णालयात नेण्यात आले जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
यापूर्वी पोलिसांनी अटक केलेल्या चार जणांमध्ये दोन शूटर्सचा समावेश होता, ज्यांना पोलिसांनी घटनास्थळी पकडले होते. आणि आज पाच जणांना अटक करण्यात आली आहे.