भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन राष्ट्रांनी त्यांचा सर्वोच्च सन्मान प्रदान केला आहे . गयानाने आपला सर्वोच्च सन्मान ‘द ऑर्डर ऑफ एक्सलन्स ऑफ गयाना’ आणि डॉमिनिकाने पंतप्रधान मोदींना ‘डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर’ प्रदान केला आहे .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या तीन देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात ‘द ऑर्डर ऑफ एक्सलन्स’ गयानाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे .गयानचे अध्यक्ष मोहम्मद इरफान अली यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कॉमनवेल्थ ऑफ डॉमिनिकाने पंतप्रधान मोदींना आपला सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर प्रदान केला आहे. अध्यक्ष सिल्व्हानी बर्टन यांनी कोविड-19 महामारी दरम्यान केलेल्या पंतप्रधानानी केलेल्या प्रयत्नांची पोचपावती आणि भारत आणि डोमिनिका यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी केलेल्या समर्पणाबद्दल मोदींना हा पुरस्कार प्रदान केला आहे . कॅरिकॉम परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी येथे उपस्थित आहेत.
हे दोन्ही पुरस्कार भारतातील जनतेला समर्पित करत पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशांबद्दल आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करत X-हँडल पोस्टवर या संस्मरणीय क्षणांचे फोटोही शेअर केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले, “गयानाचा सर्वोच्च सन्मान ‘द ऑर्डर ऑफ एक्सलन्स’ बहाल केल्याबद्दल राष्ट्रपती डॉ. इरफान अली यांचे मनःपूर्वक आभार. ” तसेच त्यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले आहे की , ”मला ‘डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर’ बहाल केल्याबद्दल डॉमिनिकाच्या अध्यक्षा सिल्व्हानी बर्टन यांचे आभार. हा सन्मान माझ्या भारतातील बहिणी आणि बांधवांना समर्पित आहे. तसेच हे आपल्या देशांमधील अतूट बंधनाचेही प्रतीक आहे”.
यादरम्यान पंतप्रधान मोदींनी त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पंतप्रधान डॉ. कीथ रॉली यांचीही भेट घेतली. याबाबत पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर लिहिले आहे की, “त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पंतप्रधान डॉ. किथ रॉली यांच्याशी अतिशय उपयुक्त भेट झाली. आमच्या देशांमधील व्यापारी संबंधांमध्ये विविधता कशी आणता येईल याबद्दल आम्ही बोललो. विज्ञान, आरोग्य सेवा, शिक्षण, अक्षय ऊर्जा आणि कृषी यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्याची मोठी क्षमता आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगोने यूपीआयचा स्वीकार केला ही अतिशय आनंदाची बाब आहे. कृषी आणि अन्न प्रक्रियेशी संबंधित सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणे हे देखील स्वागतार्ह पाऊल आहे.
सुरीनामशी घट्ट मैत्री !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरीनामचे राष्ट्रपती चान संतोखी यांचीही येथे भेट घेतली. पंतप्रधानांनी त्यांच्या X हँडलवर या बैठकीबद्दल लिहिले आहे की , “जॉर्जटाऊनमध्ये सुरीनामचे अध्यक्ष चान संतोखी यांना भेटलो. आम्ही व्यापार, तंत्रज्ञान, ऊर्जा, टेलिमेडिसिन आणि इतर क्षेत्रातील द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. आम्ही सांस्कृतिक आणि लोक ते लोक संबंध आणखी सुधारण्याच्या मार्गांवर देखील चर्चा केली. सुरीनाममधील विविध विकास उपक्रमांना भारत पाठिंबा देत राहील.
जागतिक समुदायासाठी असाधारण सेवेचे यश
गयानाच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित होणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चौथे परदेशी नेते असल्याची अधिकृत माहिती नवी दिल्लीत देण्यात आली आहे गयानाच्या स्टेट हाउसमध्ये आयोजित समारंभात गयानाचे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद इरफान अली यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींना त्यांच्या दूरदर्शी प्रतिभेसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे . जागतिक मंचावर विकसनशील देशांच्या हक्कांसाठी केलेले समर्थन, जागतिक समुदायासाठी अपवादात्मक सेवा आणि भारत-गियाना संबंध मजबूत करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेबद्दल पंतप्रधान मोदी यांना या सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार स्वीकारताना पंतप्रधान मोदींनी हा सन्मान भारताच्या लोकांना आणि दोन्ही देशांमधील संबंधांना समर्पित केला. तसेच त्यांचा हा दौरा भारत-गियाना मैत्री अधिक दृढ करण्याच्या भारताच्या निरंतर वचनबद्धतेचा पुरावा आहे असे मोदी म्हणाले आहेत.