पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल संसदेमध्ये गुजरात दंगलीवरील ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट पाहिला. यावेळी मोदींसोबत गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, जेपी नड्डा आणि इतर सहकारी उपस्थित होते. चित्रपट पाहिल्यानंतर निर्मात्यांचे अभिनंदन करायला हवे, अशी प्रतिक्रिया मोदींनी दिली आहे
यानंतर पंतप्रधानांनी इन्स्टाग्रामवर अनेक छायाचित्रे शेअर केली आहेत. तसेच ते आपल्या ट्विटर (एक्स) संदेशात म्हणाले की, एनडीएच्या खासदारांसोबत साबरमती रिपोर्ट पाहिला. निर्मात्यांनी घेतलेल्या मेहनतीचे मी कौतुक करतो. तसेच गृहमंत्री अमित शाह यांनीही या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आणि याला सत्याचा विजय म्हटले होते. .
यावेळी या चित्रपटातील अभिनेता विक्रांत मेस्सी आणि राशी खन्ना हेही पंतप्रधान मोदी यांच्यासह उपस्थित होते. पंतप्रधान मोदींसोबत हा सिनेमा पाहिल्यानंतर विक्रांत मेस्सीने म्हटले आहे की, हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण होता.
‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट 2002 च्या गुजरात दंगलीवर तयार करण्यात आला आहे. साबरमती एक्स्प्रेसला लागलेली आग हा अपघात नसून षड्यंत्र असल्याचे या चित्रपटात सांगण्यात आले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 30 कोटींची कमाई केली आहे,