जळगाव जिल्ह्याच्या पाळधी गावात काल ३१ डिसेंबरच्या रात्री दगडफेक आणि जाळपोळची घटना घडली आहे. शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांच्या परिवारास घेऊन जात असलेल्या वाहनाच्या चालकाने हॉर्न वाजवल्याच्या अन् कारचा कट लागल्याच्या कारणातून हा वाद उफाळला असल्याची माहिती समोर आली आहे.
यानंतर पाळधी गावचे काही तरुण आणि शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी राडा घातला. संतप्त जमावाने यावेळी पाळधी गावात दगडफेक आणि जाळपोळ केली. या घटनेत १२ ते १५ दुकाने जाळली आहेत.दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पाळधी गावात पोचत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून सद्यस्थितीत पाळधी गावात तणावपूर्ण शांतता आहे.
तसेच पोलिसांनी गावांमध्ये शांतता पाळा, अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं आहे. एकंदरीत 20 ते 25 जणांवरती झालेल्या प्रकाराबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
यानंतर दगडफेक व जाळपोळ करणारे संशयित हे पसार झाले. रात्री उशिरापर्यंत दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्यांचा शोध पोलिसांकडून सुरू होता. घटनास्थळावरून आरोपी पळून गेल्याने परिस्थिती नियंत्रणात असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.