कल्याण पूर्व येथील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून घरात नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला. त्यानंतर पत्नी आणि एका मित्राच्या मदतीने त्या मुलीचा मृतदेह कब्रस्तानात फेकून देणारा नराधम आरोपी विशाल गवळी याला पोलिसांनी शेगावमधन अटक केली होती. तसेच त्याची पत्नी साक्षी हिलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात असलेल्या विशाल आणि साक्षी यांची पोलीस कोठडी संपल्याने आज पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. आता न्यायालयाने त्या दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे . न्यायालयाचा हा निर्णय ऐकताच नराधम आरोपी विशालला न्यायालयाच्या आवारातच रडू कोसळले आहे.
अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि अत्याचार व हत्या या प्रकरणी विशाल गवळी आणि साक्षी गवळी यांना १८ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी अजून कोणी या दोघांना सामील होते का याची चौकशी पोलीस या काळात करणार आहेत.
दरम्यान ॲडव्होकेट संजय मिश्रा यांनी सांगितले आहे. की ,”पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपींना कोर्टात हजर केल्यानंतर, त्यांचा तपास पूर्णत्वास आला आहे, असा विश्वास आहे, त्यामुळेच त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.”
बदलापूरमधील अत्याचार प्रकरणाचा संदर्भ देत आरोपीच्या वकिलांनी अशी भीती व्यक्त केली होती की, विशाल आणि त्याच्या पत्नीला पोलीस चकमकीत ठार मारले जाऊ शकते. त्यामुळे त्यांना पोलीस कोठडीत नातेवाईकांच्या संपर्कात राहण्याची परवानगी द्यावी,.मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे.