बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपास यंत्रणेने आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र, खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याच्यावरही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी आणि त्याच्यावर हत्येचा गुन्हाही दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.तसेच सामूहिक आत्मदहनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
याच पार्श्वभूमीवर महत्वाची माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोलले जात आहे. आता वाल्मिक कराड याचा शस्त्र परवाना रद्द केला आहे.हे. तसेच बीडमधील शस्त्र परवाना रद्द प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी अन्य 100 जणांना नोटीस पाठवली आहे. त्यावेळी शस्त्र तात्काळ जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच निलंबित झाल्यानंतर ही शस्त्र सापडल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकरात तपास पूर्ण व्हावा यासाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आणि संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी काही मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये या प्रकरणाच्या तपासासाठी सतीश माने आणि उज्जवल निकमांची नियुक्ती करावी, वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करावा,एसआयटीमध्ये पंकज कुमावत यांचा समावेश करावा,पोलीस निरीक्षक प्रशांत महाजनांना निलंबित करावे इत्यादी मागण्यांचा समावेश आहे.