क्रिकेटच्या चाहत्यांना इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचा हंगाम कधी सुरू होणार याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान चाहत्यांची उत्सुकता संपली आहे.इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 23 मार्च 2025 पासून सुरू होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी रविवारी ही माहिती दिली आहे.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले की, महिला प्रीमियर लीगच्या ठिकाणाबाबत जवळजवळ स्पष्टता आली आहे. त्याबाबत लवकरच एक प्रेस नोट जारी केली जाईल. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारतीय संघाबाबत ते म्हणाले की, याबाबत 18 किंवा 19 तारखेला बैठक होईल. यानंतर त्यांनी सांगितले की आयपीएल 23 मार्चपासून सुरू होईल.तर 25 मे रोजी स्पर्धेतील अंतिम सामना खेळला जाईल. नुकतीच मुंबईत बीसीसीआयची वार्षिक बैठक पार पडली. यावेळी जय शहानंतर देवजित सौकिया यांची बीसीसीआयच्या सचिवपदी निवड करण्यात आली आहे.आयपीएलसह वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेबाबतही महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धेची तारीख आणि ठिकाण जवळजवळ निश्चित झालं आहे. यापूर्वी आयपीएल 2024 स्पर्धेचा थरार, 22 मार्चला सुरू झाला होता. आयपीएल 2025 स्पर्धेतील सलामीचा सामना कोलकाताच्या इडन गार्डन्सच्या मैदानावर रंगणार असल्याचं म्हटले जात आहे.
१८-१९ जानेवारी रोजी होणाऱ्या पुढील बैठकीत आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ अंतिम करण्यावर भर असेल. १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-२० आणि चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर खेळल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. भारत चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध २० फेब्रुवारीला खेळणार आहे. तसेच भारत आपले सर्व सामने हायब्रीड मॉडेलनुसार दुबईत खेळेल तर इतर संघांचे सामने यजमान देश पाकिस्तानमध्ये खेळवले जातील.