मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील 6आरोपींना कोर्टात हजर करणार आहेत. ह्या 6 आरोपींची आज CID कोठडी संपणार असून सुरक्षेच्या कारणास्तव बीड कोर्टात होणार सुनावणी होणार आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनवणे ,प्रदीप घुले, महेश केदार ,जयराम चाटे या सहा आरोपींची सीआयडी कोठडी संपल्याने आज त्यांना पुढील न्यायालयीन सुनावणीसाठी बीड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. केज न्यायालयात होणारी ही सुनावणी सुरक्षेच्या कारणासाठी आज बीड जिल्हा न्यायालयात होणार आहे.
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात चांगलेच चर्चेत आले आहे. पोलिसांकडून या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असली तरी कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराड सह सर्व आरोपीवर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.
मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज इतर आरोपींबरोबरच वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर केज जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.
या दोन्ही सुनावणींकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. दरम्यान कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही दोषी व्यक्तीला सोडले जाणार नाही. तपास यंत्रणा योग्य तपास करतील”, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.