अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली असून आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. ट्रंप यांनी महिला खेळांमध्ये ट्रान्सजेंडर खेळाडूंच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा निर्णय घेत कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी देखील केली आहे. ट्रम्प यांनी अगदी शपथ घेतल्यापासूनच एकामागून एक धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. आता त्यांच्या या निर्णयाने देखील अमेरिकेत खळबळ उडवून दिली आहे.
ट्रम्प यांनी दिलेल्या आदेशानंतर आता ट्रान्सजेंडर खेळाडूंना महिलांच्या खेळांमध्ये भाग घेता येणार नाही. हा आदेश त्या ट्रान्सजेंडर खेळाडूंनाही लागू होईल, जे जन्मतः पुरुष होते आणि नंतर लिंग बदल करून महिला झाले आहेत.
आपला निर्णय देताना ट्रम्प म्हणाले की, “आम्ही महिला खेळाडूंच्या अभिमानास समर्थन देऊ आणि पुरुषांना आमच्या महिला आणि मुलींना, जखमी करण्यास, मारहाण करण्यास आणि फसण्यास परवानगी देणार नाही. आता पासून, महिला खेळ फक्त महिलांसाठीच असेल. या आदेशानुसार, ज्या शाळा आणि शैक्षणिक संस्थांना, ट्रान्सजेंडर खेळाडूंना महिला संघांमध्ये सहभागी होऊ देतात, त्यांना फेडरल निधी नाकारला जाईल. असं त्यांनी स्प्ष्ट केलं आहे.
ट्रम्प यांच्या या आदेशानंतर व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी याविषयी सांगितले आहे की, ‘हा आदेश ट्रम्प यांच्या आश्वासनापैकी एक आहे. ज्यात त्यांनी महिलांना क्रीडा क्षेत्रात समान संधी देण्याबाबत बोललं होत. शाळा, महाविद्यालये आणि इतर खेळाडू संघटनांमध्ये हा निर्णय तात्काळ लागू करण्यात आला असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केला आहे.
याशिवाय ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक बाबतही मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी ते समितीवरही दबाव आणण्याची योजना करत असल्याचे जाहीर केल आहे. यामुळे २०२८ मध्ये लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकपूर्वी ट्रान्सजेंडर खेळाडूंच्या सहभागाबाबतचे नियम बदलले येणार आहेत. असं देखील बोललं जात आहे.
दरम्यान, ट्रम्प यांच्या या निर्णयाचा ट्रान्सजेंडर लोकसंख्येवर कसा परिणाम होईल याबात अजूनही स्पष्टता नाही, मात्र, यामुळे नक्कीच ट्रान्सजेंडर लोकांमध्ये नाराजीची भावना असेल. कार्यकारी आदेशानुसार, ट्रान्सजेंडर सैनिकांना अमेरिकन सैन्यात सामील होण्यास बंदी घालण्याचा देखील निर्णय घेतला जाऊ शकतो. असा अंदाज देखील वर्तवला जात आहे.