पश्चिम अलास्कामधील नोम शहराकडे जात असताना बेपत्ता झालेले विमान आता सापडले आहे. अचानक बेपत्ता झालेले हे विमान समुद्राच्या बर्फात कोसळलेले सापडले आहे. या विमानात दहा प्रवासी देखील होते. या दुर्घटनेत विमानातील सर्व 10 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. काल हे विमान अचानक बेपत्ता झाले होते, तेव्हापासून या विमानाचा शोध सुरु होता, अखेर बचावकर्त्यांना यात यश आल. बचावकर्त्यांनी अवकाशातून विमानाचे अवशेष पहिले त्यानंतर बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत विमानातील सर्व मृत लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.
अलास्काच्या सार्वजनिक सुरक्षा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ‘प्रवासी विमानाने 9 प्रवाशांसह व एक पायलटसह उनालाक्लीट येथून उड्डाण केले. मात्र, पुढील तीस मिनिटांचं या विमानाचा संपर्क तुटला. त्यांनंतर काही वेळातच शोध कार्य सुरु केलं आणि काही तासांनी हे विमान सापडले, मात्र, या दुर्घटनेत सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आल्याची माहिती आहे.
अपघातानंतर आता अशीही माहिती समोर येत आहे की, ‘विमानाने उड्डाण केले तेव्हा हलका बर्फ आणि धुक्यांचे वातावरण होते. खराब हवामानामुळे अधिकाऱ्यांचा विमानाशी संपर्क तुटला आणि ही दुर्घटना घडली.’
अशाप्रकारे विमानांचा अपघात होणे ही अमेरिकेतील एका आठवड्यातील तिसरी घटना आहे. यापूर्वी २९ जानेवारी रोजी देशाच्या राजधानीजवळ एक व्यावसायिक जेटलाइनर आणि लष्कराचे हेलिकॉप्टर यांच्यात टक्कर झाली. ज्यामध्ये ६७ जणांचा मृत्यू झाला. तर ३१ जानेवारी रोजी फिलाडेल्फियामध्ये एक वैद्यकीय वाहतूक विमान कोसळले, ज्यामध्ये विमानातील सहा जणांचा आणि जमिनीवर असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
दरम्यान, अलास्कामध्ये डोंगराळ प्रदेश आणि बदलते हवामान आहे. तसंच येथील अनेक गावे रस्त्यांशी जोडलेली नाहीत आणि त्यामुळे एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यास इथं चांगल्या सुविधा नाहीत. अशास्थितीत इथं लहान विमानांचा वापर केला जातो. अलास्कामध्ये डोंगराळ प्रदेश व कायम धुक्यांचे वातावरण असल्याने सातत्याने अशा घटना इथं घडत असतात.