कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. यंदा रोहितची नजर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वर आहे. मात्र, याचदरम्यान रोहितच्या कर्णधारपदावर आणि वजनावर काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी एक टिप्पणी केली आहे. ज्यामुळे देशभरातून त्यांच्यावर टीका होत आहे. तर बीसीसीआयनेही यावर प्रतिक्रिया देत ही टिप्पणी अस्वीकारार्ह आहे असं म्हणत संताप व्यक्त केला जात आहे.
रविवारी भारत आणि न्यूझीलंडमधील सामन्यादरम्यान शमा मोहम्मद यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर रोहित शर्माला त्याच्या वजनावरून सुनावत “निष्प्रभ कर्णधार” अम्हंटल आहे. त्याने वजन कमी करण्याची गरज आहे! आणि नक्कीच, तो भारताचा सगळ्यात प्रभावहीन कर्णधार आहे.” असं टिप्पणी त्यांनी केली होती. त्यानंतर देशभरातून त्यांच्या या वक्तव्याचा विरोध केला जात आहे. तसेच त्यांनी असं व्यक्तव्य करणं योग्य नसल्याचंही म्हंटल आहे.
त्यानंतर बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांना टिप्पणीवरून चांगलेच सुनावले आहे. त्यांनी अशा प्रकारच्या कमेंट्स पूर्णपणे अस्वीकार्य आहेत. असं म्हंटल आहे.
या विधानावर प्रतिक्रिया देताना बीसीसीआय सचिवांनी आयएएनएसला सांगितलं, “जेव्हा टीम इंडिया आयसीसी स्पर्धा खेळत आहे, तेव्हा कोणत्याही नेत्याने अशा प्रकारची टिप्पणी करणं धक्कादायक आहे.” “हे दुर्दैवी आहे. आपल्या कर्णधारावर अशी टिप्पणी पूर्णपणे अस्वीकार्य आहे. टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचली आहे आणि या वेळी अशा प्रकारच्या गोष्टी आश्चर्यकारक आहेत. आम्ही या प्रकरणाकडे लक्ष देणार आहोत.” अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या 12 व्या सामन्यात भारतीय संघाने 44 धावांनी विजय मिळवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात भारताला पहिल्यांदा न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवता आला आहे. या सामन्यात भारताने प्रथम 249 केल्या. ज्याचा पाठलाग न्यूझीलंड संघाला करता आला नाही न्यूझीलंडचा संघ 205 धावांवरच ऑलआऊट झाला. अशास्थितीत भारताने 44 धांवांनी न्यूझीलंड विरुद्ध विजयाची नोंद केली. आता टीम इंडिया 4 मार्च रोजी खेळल्या जाणाऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाशी दोन हात करणार आहे.