हॉलीवूडचा प्रसिद्ध चित्रपट ‘अनोरा’ ने 97 व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट स्टोरी, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटिक आणि सर्वोत्कृष्ट कलाकार म्हणूनच पाच ऑस्कर पुरस्कार जिंकून इतिहास रचला आहे.
या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री मिकी मॅडिसनला तिच्या दमदार अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर चित्रपटाचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि स्टोरीचेही कौतुक झाले आहे. ‘अनोरा’ हा चित्रपट काही वेळातच प्रेक्षक आणि समीक्षकांमधील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक बनला.
अनोरा या चित्रपटातील भूमिकेसाठी मिकी मॅडिसनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. तिच्या अभिनयाचे केवळ प्रेक्षकांनीच नव्हे तर चित्रपट समीक्षकांनीही कौतुक केले आहे. हा विजय अभिनेत्रीच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा टर्निग पॉईंट ठरला आहे. या विजयासह अभिनेत्री आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी लोकप्रिय झाली आहे.
यावर्षी सर्वाधिक पुरस्कार जिंकण्याचा विक्रम जरी ‘अनोरा’ च्या नावावर असला, तरी ‘द ब्रुटॅलिस्ट’ ने देखील उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ‘द ब्रुटॅलिस्ट’ हा चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासह 3 श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकला आहे.
‘अनोरा’ ने आपल्या अप्रतिम कामगिरीने चित्रपटसृष्टीत एक नवीन मार्क सेट केला आहे. या चित्रपटाचे यश हे सिद्ध करते की हा चित्रपट केवळ प्रेक्षकांनाच आवडला नाही तर चित्रपट समीक्षक देखील या चित्रपटाचे भरभरून कौतुक करत आहेत. हा चित्रपट कलात्मकदृष्ट्या तर उत्कृष्ट आहेच पण चित्रपटातील सर्व तांत्रिक बाबी देखील उत्कृष्ट आहेत.