महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी यांना औरंगजेबाबाबत केलेले वक्तव्य चांगलेच महागात पडले आहे. अधिवेशाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी औरंगजेब क्रूर शासक नव्हता वगैरे म्हणत त्याचं कौतुक केलं होत. ज्यानंतर सर्वत्र त्यांच्यावर टीका करण्यात आली व अधिवेशनात देखील हा मुद्दा मांडण्यात आला आणि त्यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली होती.
त्यानंतर त्यांच्या निलंबनाचा प्रस्तान विधिमंडळात सर्वानुमते मंजूर करण्यात आला व त्यांना अधिवेशनातून निलंबित करण्यात आले. निलंबनानंतर आता अबू आझमी यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहित आपलं निलंबन रद्द करण्याची मागणी केली आहे.
अबू आझमी यांनी राहुल नार्वेकर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘माझ्या वक्तव्याला चुकीचे दाखवण्यात आले आहे. मी जे काही बोललो ते इतर अनेक इतिहासकार आणि लेखकांनी लिहिलेल्या आधाराव बोललो आहे. मी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कोणतीही वादग्रस्त टिप्पणी केलेली नाही. मी छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोघांचाही आदर करतो. असं अबू आझमी यांनी म्हटलं. पुढे त्यांनी निलंबन मागे घेण्यासाठीची विंनती केली आहे.
After being suspended from the Maharashtra Assembly over his remarks on Aurangzeb, Samajwadi Party MLA Abu Azmi has written a letter to Assembly Speaker Rahul Narwekar, requesting the revocation of his suspension pic.twitter.com/GWKxg7Sijh
— IANS (@ians_india) March 7, 2025
अबू आझमी काय म्हणाले होते?
नुकताच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांवर झालेले अत्याचार दाखवण्यात आले आहेत. हे अत्याचार औरंगजेबाने केले होते. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर औरंगजेबाचा निषेध करण्यात येत होता. यादरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सापा आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब क्रूर शासक नव्हता वगैरे म्हणत त्याचं कौतुक केलं होत. ज्यानंतर सर्वत्र त्यांच्यावर टीका करण्यात आली. भाजपा व शिवसेना (शिंदे) गटाच्या आमदारांनी विधानसभेत त्यांच्या वक्तव्यावरून गोंधळ घातला. आणि त्यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. त्यानंतर अबू आझमी यांचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आलं.