टीम इंडिया रविवारी दुबईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना खेळेल. या सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंड संघाशी होणार आहे. चाहते या सामन्यासाठी खूप उत्सुक आहेत. चाहत्यांना हा सामना घरी बसून किंवा प्रवासात असले तरी पाहता येणार आहे. चाहते टीव्ही तसेच मोबाईवर दोन्ही ठिकाणी हा सामना पाहू शकतील.
टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत फायनल मध्ये प्रवेश केला. तर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव कात फायनलमध्ये धडक मारली. चॅम्पियन्स ट्रॉफचा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना कधी आणि कुठे बघता येईल :-
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी दुपारी 2.30 वाजल्यापासून अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना Jio Hotstar ॲपद्वार मोबाईलवर थेट पाहता येईल.
सोबतच या सामन्याचे टीव्हीवर थेट प्रक्षेपणही होणार आहे. यासाठी स्टार स्पोर्ट्स किंवा स्पोर्ट्स 18 चॅनलचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.
दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आत्तापर्यंत टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. कोहलीने 4 सामन्यात 217 धावा केल्या आहेत. तर श्रेयस अय्यरने 4 सामन्यात 195 धावा केल्या आहेत. शुभमन गिलने 157 धावा केल्या आहेत.
दुसरीकडे आपण सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांबद्दल बोललो तर मोहम्मद शमी अव्वल स्थानावर आहे. शमीने 4 सामन्यात 8 विकेट घेतल्या आहेत. तर वरुण चक्रवर्तीने 2 सामन्यात 7 विकेट घेतल्या आहेत.