नागपूर दंगलींच्या तपासादरम्यान अनेक नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे, नुकतच एका मोठ्या खुलाशात, पोलीस अधिकाऱ्यांनी या हिसाचारात बांगलादेशी दहशतवादी गटांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला आहे. फक्त संशयच नाही तर, हा संभाव्य संबंध उघडही केला आहे, विशेषतः या तपासात सोशल मीडियावरील प्रक्षोभक पोस्ट, ज्या द्वेष आणि हिंसाचाराला उत्तेजन देत असल्याचे दिसून आले आहे. ही माहिती समोर आल्यानंतर स्थानिक पोलिस आणि गुप्तचर संस्थां सक्रीय झाल्या आहेत.
सोमवारी नागपुरातील काही भागात संध्याकाळच्या वेळी अशांतता वाढली, तर काही भागात दंगलीचे वातावरण निर्माण झाले. काही दंगखोर शस्त्रे घेऊन रस्त्यावर धावत असल्याचे दिसून आले यादरम्यान अनेक पोलिस अधिकाऱ्यांवर देखील हल्ला झाला. या दंगलीत एकूण ३४ पोलिस कर्मचारी जखमी झाले. मुख्यमंत्र्यांसह अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की दंगल पूर्वनियोजित असल्याचे दिसून येते. तसेच अशांतता पसरवण्यात सोशल मीडिया हा एक महत्त्वाचा घटक असल्याचे तपासात निदर्शनास आले आहे, ज्यामध्ये हिंसाचार भडकवण्यात सोशल मिडीयावरील भडकाऊ पोस्ट आणि संदेश यांचा मोठा वाटा आहे. हे भडकाऊ संदेश मोठ्या प्रमाणात पसरवले गेल्याने त्यातूनच दंगल उसळली असल्याचे बोलले जात आहे.
त्याच पार्श्वभूमीवर आता शहर पोलिसांची सायबर टीम सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बारकाईने लक्ष ठेवून विविध अकाउंट्सची सखोल चौकशी करत आहे. त्यानंतर बुधवारी, प्रक्षोभक पोस्ट करणाऱ्या चार व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. एका फेसबुक अकाऊंटवरून एका विशिष्ट समुदायाविरुद्ध अत्यंत अपमानास्पद भाषेत टिप्पणी करण्यात आली. या फेसबुक अकाउंटची तपासणी केल्यावर ते बांगलादेशातून नियंत्रित होत असल्याची माहिती समोर आली.त्यामुळे पोलिसांची चिंता वाढली असून यानंतर गुप्तचर संस्थाही सतर्क झाल्या आहेत व सखोल चौकशी सुरू झाली आहे.
नागपुरात मोठ्या संख्येने बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांची उपस्थिती चिंताजनक आहे. हे लोक प्रामुख्याने शहराच्या दाट लोकवस्ती असलेल्या मध्य आणि उत्तरेकडील भागात राहतात. भारताच्या इतर भागात राहणाऱ्या बांगलादेशातील या बेकायदेशीर घुसखोरांचा याधीही अनेक घटनांमध्ये सहभाग दिसून आला आहे. त्यामुळे नागपूरमधील हिंसाचारामध्ये सुद्धा या घुसखोरांचा आणि पर्यायाने बांगलादेशचा संबंध असल्याची शक्यात असल्याने पोलीस आता अधिक सतर्क झाले आहेत.