सांगली: महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरांचे प्रमाण वाढले आहे. राज्यात प्रामुख्याने मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरात तर त्यांचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे. पण आता याला लहान शहरे देखील अपवाद राहिले नाहीत. कारण आता लहान शहरांमध्ये तर काही निमशहरांमध्ये बांगलादेशीनी घुसखोरी केली असल्याची तसेच ते चोरून राहत असल्याची माहिती समोर आली आहे,पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीमध्ये बनावट कगदपत्र बनवत एका बांगलादेशी घुसखोऱ्याच्या पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे. चौकशदरम्यान त्याने आपण बांगलादेशातील ढाकातील असल्याचे सांगितले आहे. आपले मूळ नाव अमीर हुसैन असूनही त्याने अमीर शेख या नावाचा वापर करत बनावट कागदपत्रांचा वापर केला.
बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन तो काही दिवस एका लॉजमध्ये वास्तव्य करत होता. मात्र जेव्हा या घटनेची माहिती सांगली पोलिसांना समजली तेंव्हा पोलीस अधिकारी संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली आहे. संबंधित प्रकरणावर सांगलीचे उपनिरीक्षक संजय पोवार यांनी संबंधित गावातमध्ये गस्त घालत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्याच्या चौकशीला सुरूवात करण्यात आली असून आपण बांगलादेशातील असल्याचे त्याने मान्य केले आहे.
तसेच घुसखोरी करणाऱ्या या शेख नावाच्या युवकाने स्वतःचे आधारकार्ड बनवले होते आणि त्यावर एबीसी नजदीक, आंबेडकर चौक, मुनरीका गाव, जेएनयू, दक्षिण-पश्चिम असा पत्ता नमूद करण्यात आला होता. मात्र पोलिसांना संबंधित शेख हा घुसखोर असल्याचा संशय आला. त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने आपण बांगलादेशी असल्याची खरी ओळख सांगितली आहे.आपण ढाक्यातून आलो असल्याचेही त्याने सांगितले आहे.
मात्र असे अवैधरीत्या घुसखोरी केल्याने त्याच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या त्याच्यावर कलम ३ (अ), ६ (अ), पारपत्र अधिनियम भारतात प्रवेश १९५०, कलम १४ अ (ब) परकिय नागरिक आदेश १९४८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.