Prashant Kortakar: छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant)यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला २४ मार्च रोजी तेलंगणातून अटक करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे(BJP) आमदार परिणय फुके(Parinay Fuke) यांनी काॅंग्रेसवर(Congress) गंभीर आरोप केले आहेत.
आमदार परिणय फुके यांनी दावा केला आहे की, प्रशांत कोरटकर हा तेलंगणात एका काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसला होता. तसेच त्याला तिकडे जाण्यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी मदत केली होती. फुके असेही म्हणाले आहेत की, काँग्रेस कोरटकरला वाचवू पाहतेय. पण मी सर्वांना खात्री देतो की, आमचे सरकार त्याला कडक शिक्षा देईल. परिणय फुके यांच्या या दाव्यानंतर विविध चर्चांणा उधाण आले आहे.
येथील काही नेत्यांनी सांगितले आहे की, कोरटकरला कोणत्या मार्गाने तेलंगणात नेण्यात आले. कोरटकरला गडचिरोलीमार्गे तेंलगणात नेले ही माहिती ज्या लोकांनी दिली तेही लोक यात सहभागी असल्याचा दावा परिणय फुके यांनी केला आहे.
हे सगळे महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्यासाठी काँग्रेसचा प्रयत्न आहे. काॅंग्रसे पक्षाने कोरटकरला एक महिन्यापासून संरक्षण दिले होते. महायुतीच्या सरकारला बदनाम करण्याचा त्यांचा कट होता, असे गंभीर आरोपही परिणय फुके यांनी केले आहेत.