ईदच्या निमित्ताने भाकपकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. भाजपने उचलले हे पाऊल ऐतिहासिक मानले जात आहे. ईदच्या निमित्ताने देशातील गरीब मुस्लिम बांधवाना सौगात-ए-मोदी हे किट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल 32 लाख गरीब मुस्लिमांना किट देण्यात येणार आहे.
ही विशेष मोहीम भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाकडून राबवण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत पक्षाचे 32 हजार पदाधिकारी 32 हजार मशिदींशी संपर्क साधून गरीब मुस्लिमांपर्यंत सौगात-ए-मोदी किट पोहचविण्याची व्यवस्था करणार आहेत. गरीब मुस्लिम कुटुंबाला ईदनिमित्त भेट म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
सौगात-ए-मोदी काय आहे?
सौगात-ई-मोदी किट ही गरीब मुस्लिमांसाठी एक भेट असेल. त्यामध्ये ईद साजरी करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक भेट वस्तू असतील. यामध्ये शेवया, खजूर, सुकामेवा, बेसन, तूप-डालडा, महिलांसाठी सुती कपडे यांसह इतर काही आवश्यक वस्तू देखील यात असतील. भाजप कडून राबवण्यात येणारी ही विशेष मोहीम गरीब मुस्लिम कुटुंबात आनंद घेऊन येईल.
ही मोहीम आजपासून सुरु होणार असून, बिहारसह अनेक राज्यात ती राबवली जाणार आहे.