मोहनलाल अभिनीत ‘एम्पुरान’ चित्रपटावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आक्षेप घेतल्यानंतर आता अभिनेत्याने माफी मागितली आहे. दिग्दर्शक पृथ्वीराज सुकुमार याचा एम्पुरान हा चित्रपट 2002 च्या गुजरात दंगलींच्या संदर्भांमुळे वादळाच्या भोवऱ्यात सापडला. अशातच आता अभिनेत्याने चाहत्यांची माफी मागितली आहे.
सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अभिनेत्याने माफी मागितीली आहे. सोबतच चित्रपटातील दंगलीचे चित्रीकरण काढण्याचा देखील निर्णय देखील चित्रपट निर्मात्यांनी घेतला आहे.
अभिनेता मोहनलाल यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, ‘मला माहित आहे की, ‘एम्पुरान’च्या दुसऱ्या भागात दाखवण्यात आलेल्या काही गोष्टी चाहत्यांना आवडलेल्या नाहीत. यातील काही सीन्समुळे चाहत्यांच्या भावना दुखावल्या आहेत. एक कलाकार या नात्याने माझी जबाबदारी आहे की, माझ्या कोणत्याही चित्रपटाने कोणत्याही राजकीय चळवळी, कल्पना किंवा धर्माविषयी द्वेष पसरवला जाणार नाही.’
मोहनलाल यांनी पुढे लिहिले, ‘एम्पुरान चित्रपटातील काही दृश्यांमुळे तुमच्या भावना दुखावल्या त्याबद्दल मी माफी मागतो. याची जबाबदारी चित्रपटामागे काम सर्व लोकांची आहे. आणि आम्ही ठरवले आहे की सर्व वादग्रस्त दृश्य चित्रपटातून काढून टाकले जातील. गेली चार दशके मी माझे सिनेमॅटिक आयुष्य तुमच्यापैकी एक म्हणून जगत आहे. तुमचे प्रेम आणि विश्वास हीच माझी शक्ती आहे. यापेक्षा मोठे काही नाही.’ अशी पोस्ट अभिनेत्याने केली आहे.