Thursday, June 5, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home Latest News

बीड येथील मशिदीवर झालेल्या स्फोट प्रकरणाची एटीएसकडून चौकशी

News Desk by News Desk
Mar 31, 2025, 06:30 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

ऐन ईदच्या तोंडावर बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धामसला गावात एका मशिदीमध्ये स्फोट करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.या स्फोटाच्या प्रकरणात बीड पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी सुरु आहे. घटनेच्या तपासासाठी अँटी टेररिस्ट स्क्वॉड (एटीएस) घटनास्थळी दाखल झाली आणि आरोपींशी त्याच दिवशी उशिरापर्यंत चौकशी करण्यात आली. एटीएस या स्फोटाचा दहशतवादी कृत्याशी काही संबंध आहे की हा केवेळ खोडसाळपणा आहे याचा तपास करत आहे,

अधिकृतपणे, या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे (LCB) देण्यात आला असून, ती या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहे. तसेच पोलिसही आरोपींच्या पार्श्वभूमीचा सखोल अभ्यास करत असून त्यांच्या सोशल मीडियावर देखील लक्ष ठेवत आहेत. स्फोटाच्या कटात किती लोकांचा समावेश होता आणि त्यामागील उद्देश काय होता, हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी तपास विविध अंगांनी सुरू आहे.

रविवारी झालेल्या या स्फोटामुळे बीड परिसरात तणाव निर्माण झाला आहे. घटनेनंतर तातडीने पोलिस प्रशासनाने अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे, आणि आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. बीड पोलिस अधीक्षक नवनीत कावर यांनी आयएएनएसला सांगितले की, स्फोट रविवारी पहाटे सुमारे २:४५ वाजता घडला. घटनेची माहिती मिळताच २० मिनिटांत पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि पहाटे ५:३० वाजेपर्यंत परिस्थितीचा आढावा घेतला.

कावर यांनी सांगितले की, “दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी मशिदीच्या आत स्फोटक उपकरणांचा वापर करून स्फोट घडवून आणला. प्राथमिक चौकशीत असे आढळले की, आरोपींचा मुस्लिम समाजातील काही मुलांसोबत वाद झाला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांनी हे कृत्य केले.” कावर यांनी सांगितले की, या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून तपासाची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आली आहे. तपासाची विशेष देखरेख करण्यासाठी एक पोलिस निरीक्षक नेमण्यात आला आहे. “हा उच्चस्तरीय तपास पारदर्शक पद्धतीने केला जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

पोलिसांनी नागरिकांना अफवांपासून दूर राहण्याचे आणि प्रशासनावर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, “कायद्याच्या चौकटीत राहून कठोर कारवाई केली जाईल, ज्यामुळे परिसरात शांतता आणि सौहार्द राखले जाईल.”

Tags: atsbeed masjid blastbeed newsTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार
राज्य

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य
राज्य

महाराष्ट्रातील ‘या’ मंदिरांचे केले जाणार नूतनीकरण; काय आहे सरकारची योजना?

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी
राष्ट्रीय

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?
इतिहास,संस्कृती

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.