Eknath Shinde: वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला काँग्रेससह शिवसेना उबाठा पक्षानेही विरोध केला होता. शिवसेना उबाठा पक्षाच्या खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर(Udhav Thackeray) हल्लाबोल केला आहे. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करून उबाठाने हिंदूत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांना कायमचे सोडले, यावर शिक्कामोर्तब झाले आहे, अशा शब्दाच एकनाथ शिंदेंनी उबाठाला सुनावले आहे.
“उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये विचारधारा सोडून अपराध केला होता. मात्र, त्यापेक्षा मोठा अपराध त्यांनी काल लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करुन केला आहे. जी भाषा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी वापरली, तीच भाषा उद्धव ठाकरे यांची होती”, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
वक्फ बोर्ड विधेयकास विरोध करायचा आणि हिंदुत्वाला विरोध नाही म्हणायचे. बाळासाहेब म्हणायचे, देशभक्त मुस्लिमांना आपला पाठिंबा आहे, देशविरोधकांना नाही, हीच भूमिका आम्ही लोकसभेत दाखवल्याचे एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करून स्वत:च्या पायावर दगड मारून घेतला आहे, असे म्हणावे लागेल. एकीकडे पक्षाला उतरती कळा लागली असताना दुसरीकडे ठाकरेंची हिंदूत्वाच्या विरोधातील भूमिका म्हणजे ठाकरेंच्या विवेकबुद्धीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. मुळात एकनाथ शिंदेंनी हिंदूत्व जपण्यासाठी ठाकरेंपासून दूर झाल्याचे स्पष्ट केले असताना आता ठाकरेंना गरज आहे की, ठाकरेही हिंदूत्ववादी आहेत हे दाखवून देण्याची. परंतु ठाकरे मात्र उलटा पाडा वाचत चालले आहेत. त्यामुळे ठाकरेंनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला करून उबाठाचे भविष्य अजूनट अंधारात टाकले आहे, असे म्हणता येईल.