6 एप्रिल रोजी भाजप आपला स्थापना दिवस साजरा करणार आहे. पक्षाचा हा ४५ वा स्थापना दिवस आहे. 6 एप्रिल 1980 रोजी राजस्थानमध्ये भाजप पक्षाची स्थापना झाली. आज भाजप सरकार राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये आहे. तसेच देशात भाजपचे सरकार आहे. पक्षाची स्थापना झाल्यापासून अनेकजण या पक्षाशी जोडले गेले आणि आजच्या घडीला भारतात भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला.
आज भाजप पक्षाने अनेक राज्यांमध्ये आपले सरकार स्थापन केले आहे. प्रत्येक राज्यात भाजप चांगली कामगिरी करताना दिसत आहे. अशातच आता महाराष्ट्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे.
भारतीय जनता पक्षाने सुरु केलेल्या सदस्य नोंदणी अभियानाअंतर्गत महाराष्ट्रात इतिहास रचला आहे. भाजपच्या या मोहिमेअंतर्गत आज १.५ कोटी सदस्य भाजपशी जोडले गेले आहेत. अशास्थितीत महाराष्ट्र राज्यात अशी कामगिरी करणारा भाजप पहिला पक्ष ठरला आहे. राज्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा विक्रम साध्य झाला आहे.
भारतीय जनता पक्षाने गेल्या काही महिन्यांपूर्वीच या अभियानाला सुरुवात केली आहे. असे असतानाही पक्षाने खूप कमी वेळात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या अभियानाअंतर्गत ग्रामीण भागापासून ते शहरी केंद्रांपर्यंत सर्व स्तरांतील नागरिक भाजपाशी जोडले गेले आहेत. या अभियानात विशेषतः महिला, युवक आणि मागासवर्गीय समाजघटकांचा मोठा सहभाग दिसून आला आहे. अशी कामगिरी करणारा महाराष्ट्र हा देशातील अग्रगण्य राज्य ठरला आहे.
दरम्यान, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या यशाचे श्रेय पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. ‘हा केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर जनतेच्या विश्वासाचा विजय आहे. दीड कोटी सदस्यांची नोंदणी हे दर्शवते की, महाराष्ट्रातील जनता भाजपाच्या विकासाच्या आणि सबका साथ, सबका विश्वास या धोरणाशी एकरूप झाली आहे.’ असं त्यांनी म्हंटल आहे.