३७० कलम लागू झाल्यापासून जम्मू आणि काश्मीर भागात बऱ्यापैकी बदलत असल्याचे दिसून येत आहे. तसेच या भागात सातत्याने होत असलेल्या दहशतवाद्यांच्या कारवाया आणि फुटीरता वाद्यांच्या हालचाली बऱ्यापैकी कमी झाल्या असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता जम्मू आणि काश्मीरसंबंधी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे बऱ्याच काळापासून जम्मू आणि काश्मीरमध्ये फुटीरतावादाला खतपाणी देणाऱ्या हुर्रियत कॉन्फरन्सशी संबंधित आणखी तीन गटांनी फुटीरतावादाचा मार्ग सोडला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबद्दल ट्विट करत ही माहिती दिली. खोऱ्यातील लोकांना भारतीय संविधानावर असलेल्या विश्वासाचे हे दर्शन असल्याचे अमित शाह यांनी म्हटले आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी जाहीर केले की, जम्मू अँड काश्मीर इस्लामिक पॉलिटिकल पार्टी, जम्मू अँड काश्मीर मुस्लिम डेमोक्रॅटिक लीग आणि काश्मीर फ्रीडम फ्रंट या तीन गटांनी हुर्रियत कॉन्फरन्सपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाऊल भारतीय संविधानावर असलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे, असे शाह यांनी स्पष्ट केले. यासोबतच, अमित शाह यांनी ट्विटरवर लिहिले की, जम्मू-काश्मीरच्या लोकांनी एकात्म आणि शक्तिशाली भारताच्या स्वप्नाला पाठिंबा दिला आहे आणि आतापर्यंत ११ संघटनांनी फुटीरतावाद सोडला आहे.
यावेळी, केंद्रीय गृहमंत्री जम्मू आणि काश्मीरमध्ये तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी या महत्त्वाच्या घोषणेला मंजूरी दिली. याशिवाय, जम्मू-काश्मीरमधील पोलिस हे फुटीरतावादी गटांविरुद्ध कठोर कारवाई करत आहेत आणि अनेक छापे टाकून पुरावे गोळा करत आहेत. २५ मार्च रोजी जेकेपीएम आणि जेकेडीपीएम या दोन फुटीरतावादी संघटनांनी हुर्रियतपासून विभक्त होण्याची घोषणा केली होती. त्यानंतर २७ मार्च रोजी अमित शाह यांनी त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले होते.
२०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर मोदी सरकारने फुटीरतावादी गटांना मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन केले आहे. याच काळात, काही संघटनांवर देशविरोधी कारवाया, दहशतवाद आणि फुटीरतावादाला पाठिंबा दिल्याच्या आरोपाखाली बंदी घालण्यात आली आहे. तेंव्हा हुर्रियत कॉन्फरन्स या संघटनेशी संलग्न असलेल्या सलीम नावाच्या व्यक्तीने म्हणले होते की,हुर्रियत कॉन्फरन्सच्या विचारसरणीबद्दल कोणताही सहानुभूती राहिलेली नाही. कारण, ही संघटना जम्मू आणि काश्मीरच्या लोकांच्या अडचणी आणि तक्रारी सोडवण्यास पूर्णत: अयशस्वी ठरली आहे. मी भारताचा एक निष्ठावंत नागरिक आहे. माझी संघटना आणि मी दोघेही भारतीय संविधानाशी निष्ठावान आहोत”, असं सलीम यांनी स्पष्ट केले होते.यापूर्वी, वकील मोहम्मद शफी रेशी यांनी देखील जम्मू-काश्मीर डेमोक्रॅटिक पॉलिटिकल मूव्हमेंट (जेकेडीपीएम) आणि ऑल पार्टीज हुर्रियत कॉन्फरन्सपासून आपल्या गट वेगळा झाल्याची घोषणा केली होती.