Mamta Banjree:देशामध्ये सध्या वक्फ बोर्डवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मंजूर झाले आहे. विधेयकाच्या बाजूने लोकसभेमध्ये २८८ तर विरोधात २३२ मते पडली आहेत. तर राज्यसभेमध्ये देखील हे विधेयक मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील स्वाक्षरी केली आहे. यामुळे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाचे लवकरच कायद्यात रुपांतर होणार आहे.
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाचे लवकरच कायद्यात रुपांतर होणार असले तरी अनेकांचा याला अद्याप विरोध कायम आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पश्चिम बंगालमध्ये ते लागू करणार नाही असा पवित्रा ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे.ममता बॅनर्जी यांनी एका भाषणादरम्यान, वक्फ सुधारणा विधेयकाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या जनतेला उद्देशून म्हणाल्या की, ‘मला कल्पना आहे की, वक्फ सुधारणा विधेयक संसदेत मंजूर झाल्यामुळे तुमच्या मनात असंतोष आहे. पण बंगालमध्ये असे काहीही घडणार नाही. राजकीय चळवळीसाठी काही लोक तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करत असतील, पण त्यांच्या भडकवण्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. याप्रकारे फोडा आणि राज्य करा धोरणातून एखादी व्यक्ती सत्ता गाजवेल त्यावेळी सगळ्यांनी एकत्र राहायला हवे आहे, असा संदेश तुम्ही द्या’.
इतिहासात लिहिले आहे की, पश्चिम बंगाल, बांगलादेश, पाकिस्तान आणि भारत हे सगळे एकत्रच होते, फाळणी नंतर झाली. पण आता जे इथे राहात आहेत, त्यांना संरक्षण देणे हे आपले काम आहे. जर लोक एकत्र राहिले, तर ते जग जिंकू शकतात, म्हणत ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये ते लागू करणार नाही,असा पवित्रा ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे.