रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेलं युद्ध अजूनही थांबताना दिसत नाही. या युद्धात दोन्ही देशांमध्ये सतत भीषण हल्ले होत आहेत. युक्रेनमधील अनेक शहरे यामुळे उद्ध्वस्त झाली आहेत. जगभरातून अनेक देशांनी या युद्धावर चिंता व्यक्त केली आहे आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरु केली आहेत.
आता हे युद्ध भयानक वळणावर पोहचले असून युक्रेनच्या सुमी शहरात रशियाने बॅलिस्टीक क्षेपणास्रे डागली आहेत.युक्रेनच्या सुमी शहरात रशियाने बॅलिस्टीक क्षेपणास्रे डागली आहेत. रविवारी झालेल्या या विध्वंसक हल्ल्यात २१ हून अधिक लोक ठार झाले आहेत हे लोक चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जात होते, तेव्हाच अचानक हा हल्ला झाला.
या हल्ल्यात सुमी शहरातील शाळा, रस्ते, इमारती, गाड्या यांना मोठं नुकसान झालं आहे. संपूर्ण परिसरात धुळीचे ढग आणि उद्ध्वस्त इमारती दिसत आहेत. युक्रेनने आता जगभरातील देशांना आवाहन केलं आहे की, रशियावर दबाव आणावा, कारण हे युद्ध आता फारच धोकादायक टप्प्यावर पोहोचलं आहे.
हा हल्ला रशिया-युक्रेन युद्धात एक धोकादायक वळण मानला जात आहे. निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याने युद्ध थांबवण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे. जगभरातील देशांनी आता शांतता स्थापनेसाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त होत आहे.