Thursday, June 5, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home गुन्हेविश्व

उल्लू ॲप वादात का? सविस्तर विश्लेषण

Renuka Pawar by Renuka Pawar
May 2, 2025, 07:36 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

वादग्रस्त सामग्री पुरवणारे ॲप्स आता भारतात गंभीर मुद्दा बनत चालला आहे. यामध्ये उल्लू तसेच इतर ॲप रडारवर आहेत. या ॲप्सवर आता बंदी घालण्याची मागणी मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली आहे. राजकीय नेते तसेच सर्वसामान्य नागरिक देखील या ॲप्सविरोधात आवाज उठवताना दिसत आहेत. पण गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला उल्लू ॲप आताच का बंद करण्याची मागणी होत आहे. तसेच सध्या हा मुद्दा एवढा चर्चेत का आला आहे? आजच्या या लेखाच्या माध्यमातून यासंबंधीची सर्वकाही माहिती जाणून घेणार आहोत.

इंडिज गॉट लॅटेंट या शो पासून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील सेन्सॉरबाबतचा मुद्दा गंभीर बनला. इंडिज गॉट लॅटेंट शो विरोधात कारवाई देखील करण्यात आली. या वादग्रस्त ‘शो’चा मुद्दा अजूनही शांत झालेला नाही तोपर्यंत आणखी एका ‘शो’ची चर्चा सुरु आहे.

खरं तर उल्लू ॲपवर प्रदर्शित होणारा Hous Arrest हा शो सध्या चर्चेत असून, या ‘शो’वर बंदी आणण्याची मागणी राजकीय नेते तसेच सर्वसामान्य नागरिक करत आहेत. उल्लू ॲपवर प्रदर्शित होणाऱ्या या ‘शो’चा होस्ट अभिनेता एजाज खान काही भागांमध्ये स्पर्धकांना अश्लील कृत्य करण्यास लावल्याच्या व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर हा मुद्दा चर्चेत आला आणि त्यावर बंदीची मागणी सुरु झाली. भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ताबडतोब हा शो बंद व्हावा अशी मागणी केली आहे.

एकीकडे इंडियाज गॉट लॅटेंटसारख्या ‘शो’वर बंदी घातलेली असताना त्याच न्यायाने एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ या ‘शो’वरदेखील बंदी घालण्याची यावी अशी मागणी सर्वत्र होऊ लागली. पण उल्लू ॲप वरील फक्त Hous Arrest हा शो बंद केल्यावर अशाप्रकारे सेक्सला प्रमोट करणारा मुद्दा संपेल का? तर नाही…कारण उल्लू ॲप मुळातच अशा प्रकराची सामग्री पुरवण्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि म्हणूनच फक्त Hous Arrest हा शो बंद न करता उल्लू ॲप तसेच यासारखे अनेक ॲप आहेत ज्यावर बंदी घालणे गरजेचे आहे.

उल्लू ॲप कोणता कंटेंट बनवते?

उल्लू ॲप हा एक सब्स्क्रिप्शन-आधारित व्हिडिओ-ऑन-डिमांड (VOD) प्लॅटफॉर्म आहे. जो प्रामुख्याने वेब सीरिज, शॉर्ट फिल्म, व चित्रपट ऑनलाईन स्ट्रीम करतो. यामध्ये प्रामुख्याने कामुक व प्रौढ-केंद्रित सामग्री बनवली जाते. उदारणार्थ, उल्लू चरमसुख, पलंग तोड, कविता भाभी. यासारख्या मालिकांसाठी हे ॲप प्रसिद्ध आहे. या मालिका अश्लील कंटेंटवर आधारित आहेत. या गोष्टींवर भारतात बंदी असताना देखील उल्लू ॲपवर अशा प्रकारची सामग्री पुरवली जाते.

यातील काही सामग्री अनैतिक नातेसंबंध यांसारख्या थीम्समुळे वादग्रस्त ठरली आहे. ज्यामुळे अनेकवेळा याविरुद्ध कारवाई देखील करण्यात आली आहे. उल्लू ॲप सेंसर आणि अनकट आवृत्त्या देखील पुरवते, तर उल्लू प्रो ॲपवर अनकट व अधिक स्पष्ट आवृत्त्या देखील उपलब्ध आहेत.

उल्लू ॲप जरी 18 वर्षांवरील प्रेक्षकांसाठी असेल तरी ते अल्पवयीन मुलांसाठी देखील सहज उपलब्ध होणारे आहे. कमी किमतीच्या सब्स्क्रिप्शन योजनांमुळे आणि सुलभ उपलब्धतेमुळे, अल्पवयीन मुलांपर्यंत ही सामग्री आरामात पोहचते. ज्यामुळे हा मुद्दा चिंतेचा विषय बनला आहे. सोबतच यात सामाजिक आणि धार्मिक थीम्स जसे की, निकाह, हलाला यांचा समावेश आहे, यामुळे देखील हे ॲप वादग्रस्त ठरले आहे. आणि म्हणूनच यांसारख्या ॲपवर बंदी आणण्याची मागणी होत आहे.

लोकप्रियता का वाढली ?

उल्लूच्या परवडणाऱ्या किंमतींमुळे याची लोकप्रियता वाढली आहे. 2020 मध्ये, या ॲपमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी 15-दिवसांची योजना फक्त 36 रुपयांपासून सुरू होती तर सध्या महिन्याचे सब्स्क्रिप्शन 99-150 रुपये, तीन महिन्याचे सब्स्क्रिप्शन सुमारे 250-300 रुपये, वार्षिक सब्स्क्रिप्शन 450-600 रुपयेमध्ये मिळते. तसेच उल्लू प्रो मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रीमियम योजना आहे. ज्याची किंमत थोडी जास्त आहे. पण कमी किंमतीत ही सामग्री उपलब्ध असल्याने वयात नसलेली मुले देखील अशा ॲप्समध्ये सहज प्रवेश मिळवतात.

-सोशल मीडियावर सहज उपलब्ध

या ॲप्सवर प्रसारित होणारे साहित्य, सोशल मीडियावर देखील सहज उपलब्ध होतात. जसे की, इंस्टाग्राम, युट्यूब. या माध्यमांद्वारे या ॲप्सवर चालणाऱ्या ‘शो’ची जाहिरात केली जाते. ज्यामुळे अनेकांना याबद्दल सहज माहिती उपलब्ध होते.

बंदी का आणली नाही?

खरं तर उल्लूच्या मालिकांवर अश्लीलता, अनुचित नातेसंबंधांचे चित्रण आणि महिलांचा अपमान करणाऱ्या कथानकांचा आरोप आहे. पण तरी देखील या ॲपवर बंदी का नाही आणली असा प्रश्न विचारला जात आहे. मार्च 2024 मध्ये, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 18 OTT प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली होती. परंतु उल्लूला यातून वगळ्यात आले होते. अशास्थितीत निवडक कारवाईचा प्रश्न उपस्थित झाला होता.

दुसरा मुद्दा म्हणजे, अशा वेबसाईट किंवा ॲप्स अनधिकृतपणे चालवले जातात ज्यामुळे अशा वेबसाईटला शोधून त्यांच्यावर बंदी आणणे अवघड होते. अशी एक वेबसाईट बंद केली तर दुसरी वेबसाईट लगेच सुरु होते. तसेच हे प्लॅटफॉर्म्स अनेकदा भारताबाहेर नोंदणीकृत असतात, ज्यामुळे यांच्यावर नियम लावणे कठीण होते.

वादग्रस्त सामग्री तयार करण्यात हे शहर पहिल्या नंबरवर

उत्तर प्रदेश मधील मेरठ हे शहर अशा प्रकराची सामग्री तयार करण्याचे केंद्र आहे, जिथे दरवर्षी 50-75 चित्रपट/मालिका वार्षिक तयार केल्या जातात. हे चित्रपट कमी बजेटचे असतात म्हणून यांना मोठ्या सेटपची गरज नसते. अगदी DSLR कॅमेरे किंवा उच्च-गुणवत्तेच्या फोनवर अशा सामग्री तयार केल्या जातात. ज्यामुळे अशी सामग्री बनवले जाणारे नेमके ठिकाण शोधणे कठीण आहे.

उल्लू ॲपबाबत कशा प्रकारच्या तक्रारी

अनेकांनी आरोप केला आहे की, उल्लूच्या सामग्रीमुळे भारतीय सांस्कृतिक मूल्ये आणि नैतिकता धोक्यात येत असून, हे तरुण पिढीच्या मानसिकतेवर परिणाम करणारे आहे. अशा प्रकारच्या सामग्रीमुळे सामाजिक गैरप्रकारांना प्रोत्साहन मिळते, आणि म्हणून याला काही जणांनी “देशाच्या प्रगतीविरोधी” असल्याचे देखील म्हटले आहे.

दुसरीकडे काहींनी या सामग्रीला “देशविरोधी” म्हणत सामाजिक मूल्यांना धोका पोहोचवणारी असल्याचे म्हटले आहे, अशा प्रकारची सामग्री समाजात गैरप्रकारांना प्रोत्साहन देते आणि तरुण पिढीवर नकारात्मक प्रभाव टाकते. असेही सोशल मीडिया वापरकर्त्यांचे म्हणणे आहे.

भारतात अशा प्रकारच्या सामग्री प्रसारित करण्यावर काय कायदा आहे?

भारतात पॉर्नोग्राफीचे उत्पादन, वितरण आणि प्रसारण बेकायदेशीर आहे. भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 292 आणि 293, माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (IT Act) कलम 67 आणि 67A, तसेच POCSO कायद्यांतर्गत बाल पॉर्नोग्राफी पूर्णपणे बंदी आहे, तर प्रौढ पॉर्नोग्राफी पाहणे खाजगीरित्या कायदेशीर आहे. पण त्याचे प्रसारण बेकायदेशीर आहे.

उपाय काय?

उल्लू ॲप, न्यूफ्लिक्स, कूकू यासारखे OTT प्लॅटफॉर्म्स आणि अवैध पॉर्न वेबसाइट्स यांमुळे तरुणांना चुकीची माहिती तसेच चुकीच्या अपेक्षा निर्माण होतात. उल्लूच्या मालिका अनेकदा कामुक आणि अनैतिक नातेसंबंधांचे चित्रण करतात, ज्यामुळे लैंगिकतेबाबत समाजात विकृती वाढते. त्यामुळे भारतात तरुणांना सेक्स एज्युकेशन, पॉर्नोग्राफी व वास्तविक लैंगिक संबंध यातील फरक समजावणे फार गरजेचे आहे. ज्यामुळे तरुण चुकीच्या माहितीपासून सुरक्षित राहतील. व त्यांचा अशा गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेले.

सध्या उल्लू ॲप व असेच अनेक OTT प्लॅटफॉर्म्स जे टीकेचे लक्ष्य बनले असले तरी हे ॲप बंद करून हा मुद्दा संपणार नसून, तरुणांना सेक्स एज्युकेशन, तसेच याविरोधात कठोर नियम आणि सामाजिक जागरूकता आणणे गरजेचे आह.  ज्यामुळे अशाप्रकराची सामग्री पाहून देखील त्याचे दुष्परिणाम कमी होऊ शकतात. हा एक गंभीर मुद्दा असून, सरकार, पालक व समाजाने एकत्रितपणे तरुणांना यापासून संरक्षित व जागरूक करण्याची गरज आहे.

Tags: Ban on porn websitesHouse Arrest ShowTOP NEWSULLU
ShareTweetSendShare

Related News

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी
राष्ट्रीय

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?
इतिहास,संस्कृती

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!
राष्ट्रीय

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

Latest News

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

महाराष्ट्रातील ‘या’ मंदिरांचे केले जाणार नूतनीकरण; काय आहे सरकारची योजना?

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.