Operration Sindoor: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर १५ दिवसांनी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले आहे. भारताने ७ मे रोजी पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम फत्ते केली आहे. अर्थातच ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानच्या १०० किलोमीटरच्या परिघात असलेल्या ९ दहशतवाद्यांचे अड्डे हल्ला करून नष्ट केले आहेत.
भारताकडून ते ९ दहशतवादी अड्डेच का लक्ष्य करण्यात आले :
– आंतरराष्ट्रीय सीमेपासून १०० किमी अंतरावर असलेल्या बहावलपूरमध्ये भारतीय सैन्याने सर्वात मोठा हल्ला केला आहे. येथे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय होते. या मुख्यालयात दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात होते. तसेच दहशतवादी विचारप्रणालीचे शिक्षण दिले जात होते आणि दहशतवादी भरती केली जात होती. आता हे मुख्यालय अस्तित्वात राहिले नाही.
– तसेच भारतीय सैन्याने सांबा सेक्टरपासून ३० किमी अंतरावर असलेल्या मुरीदके नावाच्या ठिकाणी हल्ला केला आहे. येथे लष्कर-ए-तैयबाचा एक छावणी होती. 26/11 च्या हल्ल्यातील अजमल कसाब आणि डेव्हिड कोलमॅन हेडली यांना याच ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आले होते.
– तिसरा हल्ला गुलपूरमध्ये करण्यात आला, जो पूंछ-राजौरीच्या नियंत्रण रेषेपासून ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगितले जात आहे. या तळावरील दहशतवादी जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांमध्ये सक्रिय आहेत. त्यामुळे हे ठिकाण भारताने लक्ष्य केले.
-चौथा हल्ला पाकव्याप्त काश्मीरच्या तंगधार सेक्टरमध्ये ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या सवाई प्लेस येथे करण्यात आला आहे. या ठिकाणी लष्कर कॅम्प होता, तो देखील नष्ट करण्यात आला. या ठिकाणी 20 ऑक्टोबर 2024 च्या सोनमार्ग हल्ल्यातील, 24 ऑक्टोबरच्या गुलमार्ग हल्ल्यातील आणि 22 एप्रिलच्या पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते.
– पाचवा हल्ला बिलाल कॅम्पवर करण्यात आला आहे. येथेही जैश-ए-मोहम्मदचा एक लाँचपॅड होते. ते आता भारतीय सैन्याच्या सैनिकांनी उद्ध्वस्त केला आहे.
– यानंतर भारतीय सैन्याने कोटली छावणीला लक्ष्य केले आणि ते देखील उद्ध्वस्त केले आहे. असे म्हटले जाते की, ही छावणी राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेपासून १३ ते १५ किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी आत्मघाती हल्लेखोरांना प्रशिक्षण दिले जात होते.
– भारताने पाकिस्तानमध्ये हल्ला केलेले आठवे लक्ष्य सरजल कॅम्प होते. आंतरराष्ट्रीय सीमेपासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी मार्चमध्ये जम्मू-काश्मीरमधील चार पोलिसांना मारणाऱ्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. हा कॅम्प जैश कॅम्प असल्याचे म्हटले जाते. आता हा कॅम्प अस्तित्वात नाही.
– भारतीय सैन्याचे ९ वे लक्ष्य महमूना कॅम्प होते. हा कॅम्प आंतरराष्ट्रीय सीमेपासून १२ ते १५ किलोमीटर आत असल्याचेही म्हटले जाते. या तळावरून दहशतवाद्यांना जम्मूच्या कठुआमध्ये दहशत पसरवण्यासाठी पाठवले जात होते. 2016 मध्ये पठाणकोट हवाई दलाच्या तळावर झालेल्या हल्ल्याची योजना याच ठिकाणी आखण्यात आली होती. आता हा कॅम्प भारतीय सैनिकांनी उद्धवस्त केला आहे.
दरम्यान, भारताने पहलगाम हल्ल्यानंतर १५ दिवसांनी कारवाई करत संयम दाखवल्याचे दिसून आले मात्र दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर हल्ला करताना कसलीही गैर केल्याचे दिसत नाही. तसेच भारताने केलेल्या सिंदूर ऑपरेशनमध्ये कोणत्याही निष्पाप लोकांना टार्गेट करण्यात आलेले नाही. भारताने केवळ दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर हल्ले केले आहेत. ज्या ९ ठिकाणी भारताने हल्ले केले आहेत ते भारतासाठी आवश्यक होते, कारण तेथून दहशतवादी कारवायांचे पूर्ण नियोजन केले जात होते.