दिनांक २२ एप्रिलचा तो दुर्दैवी दिवस.. त्यादिवशीची सकाळ जम्मू-काश्मीर मधल्या पहलगामच्या बैसरन येथे रक्तरंजीत दुर्दैवी घेऊन अवतरली होती की काय असा प्रश्न पडतोय कारण तब्बल २७ हिंदू पुरुषांचा धर्म विचारून गोळी घालून निर्घृण हल्यात करण्यात आली होती. त्यावेळी दहशतवाद्यांनी या ठिकाणी आलेल्या पर्यटकांना लक्ष करत पत्नीसमोर पतीची गोळ्या घालत हत्या केली.
जेव्हा पत्नी आपल्या पतीच्या आयुष्याची भीक मागत होती तेव्हा दहशतवाद्यांनी हे मोदींनी जाऊन सांगा असं म्हणत कित्येक परिवार उध्वस्त केले. ही घटना इतकी अमानवी होती की, देशभरातूनच नव्हे तर जगभरातून याची प्रचंड निंदा करण्यात आली. यानंतर पहलगाम हल्ल्यात आपल्या पतीला गमावलेल्या महिलांनी सरकारकडे न्यायाची मागणी केली.
आणि अखेर भारत सरकराने पहलगाम हल्ल्याच्या पंधराव्या दिवशी प्रत्युत्तर देत पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर एअरस्ट्राईक करत दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. भारतीय सैन्याकडून करण्यात आलेल्या या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव त्या महिलांना न्याय देण्यासाठी निवडण्यात आले ज्यांनी पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यात आपल्या पतीला गमावले.
सनातन हिंदू धर्मात सिंदूर एक अत्यंत महत्वाचे प्रतीक आहे, विशेषतः विवाहित महिलांसाठी. ते विवाह, सौभाग्य आणि पतीच्या दीर्घायुष्याची निशानी मानले जाते. आणि त्या क्रूर कर्मा दहशतवाद्यांनी याचाच अपमान केला. आणि म्हणून भारतीय सैन्याने केलेल्या या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले. विशेष म्हणजे ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सुचवण्यात आले आहे.
भारतीय सैन्याने केलेली ही कारवाई त्या प्रत्येक महिलांच्या अश्रूचा बदला आहे ज्या महिलांनी आपल्या डोळ्यासमोर आपल्या पतीला जीव सोडताना पाहिले. हा बदला प्रत्येक भारतीयाचा आहे ज्याने आपल्या देश बांधवाला पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात गमावले.
दरम्यान, भारतीय सैन्याने केलेल्या या धडक कारवाईनंतर पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आपल्या जिवलगांना गमावलेल्या नातेवाईकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्याचे आभार मानले आहेत.