पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने (७ एप्रिल ) काल पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांना उध्वस्त केले. भारताने ही कारवाई “ऑपरेशन सिंदूर” अंतर्गत केली. ”ऑपरेशन सिंदूर” हे फक्त दहशतवाद विरोधात होते व कारवाईत पाकिस्तानच्या सैन्याला तसेच सामान्य नागरिकांना कोणतीही हानी पोहचवण्यात आलेली नाही.
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत दहशतवादी ठिकाणांनाच लक्ष करत ‘दहशतवाद’ खपवून घेतला जाणार नाही असा संदेश जगाला देण्यात आला. भारतीय सशस्त्र दलांच्या या कारवाईत सर्वात मोठी भूमिका होती ती म्हणजे ‘प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टीम’ची. ज्याचा वापर भारताने ७ एप्रिलच्या एअरस्ट्राईकमध्ये केला. आजच्या या लेखात आपण ‘प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टीम’बद्दलच जाणून घेणार आहोत. नेमकी ही सिस्टीम कशी काम करते? याची खासियत काय आहे? याआधी याचा वापर झाला आहे का? याबद्दल सर्वकाही जाणून घेणार आहोत.
प्रथम कोणत्या दहशतवादी ठिकाणांना लक्ष करण्यात आले पाहूया…
भारतीय लष्कराने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या कारवाईत बहावलपूर, सियालकोट, कोटली, मुध्रिके, कलान आणि मुजफ्फराबाद या भागांमध्ये असलेले दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. भारताच्या या कारवाईत पाकिस्तानच्या लष्करी स्थळांना स्पर्शही झाला नाही. आणि हे शक्य झाले ते फक्त ‘प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टीम’मुळे.
‘Precision Strike Weapon System’ (PSWS) ही एक अत्याधुनिक लष्करी तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली आहे. यामध्ये जीपीएस, लेझर, रडार आणि इन्फ्रारेड मार्गदर्शन प्रणालींचा समावेश आहे, ज्याचा वापर करून अचूक हल्ला करता येतो. हे वेपन प्रामुख्याने ड्रोन, उपग्रह आणि रडारमधून मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्य निश्चित करते. ज्यामुळे फक्त लक्ष करण्यात आलेल्या ठिकाणांवरच याचा प्रभाव पडतो. जर हल्ला ५०-६० मीटरने चुकला, तर चुकीच्या इमारतीवर हल्ला होऊ शकतो. त्यामुळे अचूकतेचे फार महत्त्व असते. आणि म्हणून भारतीय लक्षकराने अचूक हल्ला करण्यासाठी या सिस्टीमचा वापर केला.
भारताकडून पाकिस्तानविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईतून जगाला एक स्पष्ट देण्यात आला की, या कारवाईत फक्त दहशतवाद ठिकाणांना लक्ष करण्यात आले आहे आणि दहशतवाद विरोधातच ही करवाई करण्यात आली.
प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टीममध्ये कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर?
प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टीममध्ये (PSWS) जीपीएस, रडार, लेझर आणि इन्फ्रारेड मार्गदर्शन प्रणालींचा वापर करून लक्ष्य अचूकपणे निवडले जाते आणि त्यावर हल्ला केला जातो. या प्रणालीमध्ये, ड्रोन, उपग्रह आणि रडार यांमधून मिळणाऱ्या माहितीचा वापर करून लक्ष्य निश्चित केले जाते.
जीपीएस (GPS) :
GPS अचूक स्थान निश्चित करण्यासाठी वापरले जाते, ज्यामुळे क्षेपणास्त्र किंवा बॉम्बला योग्य दिशेने मार्गदर्शन करता येते.
रडार (Radar) :
रडार प्रणालीद्वारे, लक्ष्य आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराची माहिती मिळवण्यास मदत होते, ज्यामुळे हल्ला करताना अचूकता वाढते.
लेझर (Laser) :
लेझरचा वापर लक्ष्यावर प्रकाश किरण टाकण्यासाठी केला जातो, ज्यामुळे क्षेपणास्त्र किंवा बॉम्बला योग्य दिशेने मार्गदर्शन करता येते.
इन्फ्रारेड (Infrared) :
इन्फ्रारेड प्रणालीद्वारे उष्णता आणि प्रकाशाचे बदल ओळखले जातात, ज्यामुळे क्षेपणास्त्र किंवा बॉम्बला लक्ष्य शोधण्यात मदत होते.
ड्रोन, उपग्रह आणि रडार (Drone, Satellite, Radar) :
या तंत्रज्ञानाचा वापर करून लक्ष्य आणि परिसराची माहिती मिळवली जाते, ज्यामुळे अचूक हल्ला करणे शक्य होते.
‘प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टीम’चा वापर भारताने याआधी कधी केला आहे?
-भारतात स्ट्राइक वेपन सिस्टीमचा वापर भारतात 2016 पासून सुरू झाला. 2016 मध्ये भारत सरकारने पाकव्याप्त काश्मीरमध्ये (POK) सर्जिकल स्ट्राइक करताना याचा वापर केला होता. याचा वापर करून भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवादी तळ आणि लॉन्चपेड्स (launchpads) नष्ट केले होते.
-पुढे 2019 मध्ये, भारताने बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या (Jaish-e-Mohammed) दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करण्यासाठी प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टीमचा वापर करण्यात आला होता.
-आता 7 मे 2025 रोजी देखील भारतीय सैन्याने “ऑपरेशन सिंदूर” (Operation Sindoor) अंतर्गत पाकिस्तान आणि POK मध्ये दहशतवादी तळांवर हल्ला करण्यासाठी प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टीमचा वापर केला आहे.