Friday, May 9, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home आंतरराष्ट्रीय

दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणाऱ्या पाक लष्कराचा खरा चेहरा उघड

News Desk by News Desk
May 8, 2025, 02:49 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

पाकिस्तानचा दहशतवादाशी संबंध हे केवळ आंतरराष्ट्रीय संशयाचे विषय राहिले नाहीत, तर आता त्याचे थेट पुरावेही समोर येऊ लागले आहेत. अलीकडेच लष्कर ए तय्यबा या दहशतवादी संघटनेतील दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानच्या लष्कराचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहिल्याचे चित्र सोशल मीडियावर आणि स्थानिक माध्यमांतून समोर आले. यामुळे पाकिस्तान सरकार आणि लष्कर यांचे दहशतवादी संघटनांशी असलेले संबंध आणि पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. तसेच या घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष पुन्हा एकदा पाकिस्तानच्या लष्कर-दहशतवाद संगनमताकडे वेधले आहे. पण हे नेमके प्रकरण काय आहे? चला सविस्तर जाणून घेऊयात.

त्यांचे झाले असे की २९ एप्रिल २०२५ रोजी भारतीय हवाई दलाने “ऑपरेशन सिंदूर” च्या माध्यमातून लष्कर ए तय्यबाच्या तळावर हल्ला केला. यात लश्कर ए तय्यबा या दहशतवादी संघटनेचा अब्दुल राऊफ मारला गेला. यावेळी त्याच्या अंत्यविधीत पाक लष्कराचे उच्चपदस्थ अधिकारी दहशतवाद्यांसोबत उघडपणे खांद्याला खांदा लावून उपस्थित होते, ही बाब स्थानिक पत्रकारांच्या वृत्तांतातून पुढे आली आहे. यासंदर्भातील फोटोज व व्हिडिओ क्लिप्स सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फिरत आहेत.

काही छायाचित्रांमध्ये दहशतवाद्यांच्या शवपेटींवर पाकिस्तानी ध्वज गुंडाळलेला दिसत आहे.  तसेच भारताच्या हवाई हल्ल्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये शहीद म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.  खरतर भारत आणि पाकिस्तान मध्ये सुद्धा सैनिकाचे पार्थिव ध्वजामध्ये गुंडाळून त्याला आदराने अंतिम निरोप दिला जातो. पण पाकिस्तानने चक्कं दहशतवाद्यांच्या मृत शरीराला ध्वज गुंडाळून एक प्रकारे दहशतवाद्यांना सैनिकांचाच दर्जा दिला आहे. यावरून पाकिस्तानचे मनसुबे स्पष्ट दिसत आहेत.

वस्तूतः लश्कर-ए-तय्यबा ही एक कुख्यात दहशतवादी संघटना आहे, ज्याचे मुख्यालय पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुरीदके या गावात आहे. हे ठिकाण लाहोरपासून फक्त ३० किमी अंतरावर आहे. हीच ती संघटना आहे जिने २००८ मध्ये मुंबईवर मोठा दहशतवादी हल्ला केला होता. या संघटनेवर संयुक्त राष्ट्रासह अनेक देशांनी बंदी घातलेली आहे. लश्कर-ए-तय्यबा भारताविरुद्ध सतत दहशतवादी कट रचते. मात्र यावेळी भारताने थेट त्यांच्या मुख्यालयावरच हल्ला केला आणि मोठे नुकसान केले. या कारवाईत जैश-ए-मोहम्मद या दुसऱ्या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहर याच्या कुटुंबातील १० सदस्य ठार झाले.

पाकिस्तानी लष्कर ‘जिहाद’च्या नावाखाली या दहशतवादी गटांना मदत करते आणि त्यांचा वापर भारतासारख्या देशाविरोधात करते. मात्र आता भारताने ठाम भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील आजचा नवा भारत दहशतवाद्यांना त्यांच्या भाषेतच उत्तर देण्याची तयारी ठेवतो. आता दहशतवादी आणि पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी एकत्र येण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. तर २०१२ मध्येही अशीच घटना घडली होती. तेव्हा मुरीदके येथे झालेल्या एका कार्यक्रमात पाकिस्तानचे माजी गुप्तचर प्रमुख जनरल हामिद गुल हे काही दहशतवाद्यांसोबत व्यासपीठावर दिसले होते. यावरून पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि दहशतवादी यांच्यातील संबंधही स्पष्ट झाले होते.

१. सैन्य आणि दहशतवाद्यांची जवळीक
जेव्हा एका देशाचे लष्कर, जे कोणत्याही देशाचा संरक्षणकर्ता असते, तेच देशातील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घोषित दहशतवाद्यांच्या अंत्यविधीत सहभागी होते, तेव्हा ही केवळ निंदनीय बाब नसून, ती त्या देशाच्या नीतिमत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित करते. अब्दुल राऊफ सारख्या किंवा मसूद अझहरसारख्या दहशतवाद्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या अंत्यविधीत लष्करी सलामी देणे म्हणजे अशा दहशतवाद्यांना राष्ट्रपुरुष मानण्यासारखे आहे.

२. जागतिक समुदायाची फसवणूक
पाकिस्तान अनेक वेळा संयुक्त राष्ट्रसंघ आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटनांसमोर दहशतवादविरोधी कारवाया करत असल्याचे दाखवत आले आहे. मात्र या घटनेने स्पष्ट झाले की, त्यांचे प्रत्यक्ष वर्तन आणि आंतरराष्ट्रीय वक्तव्य यामध्ये मोठा फोलपणा आहे.

३. भारत आणि इतर शेजारी देशांचा रोष
भारताने या प्रकाराचा तीव्र निषेध केला असून, हे स्पष्टपणे म्हटले आहे की पाकिस्तानच्या लष्कराची भूमिका दहशतवाद्यांना राजकीय आणि सामाजिक पाठिंबा देण्याची आहे. हा प्रकार केवळ भारतच नव्हे, तर अफगाणिस्तान, इराण, आणि इतर दहशतवादाने त्रस्त देशांसाठीही गंभीर चिंता उत्पन्न करणारा आहे.

४. आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन
एका अधिकृत लष्करी संस्थेने अशा दहशतवाद्यांच्या मृत्यूला ‘शहादत’ समजून त्याला सन्मान देणे हे आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार दहशतवाद्यांना पाठिंबा देण्यासारखेच आहे. यामुळे पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी जगातील काही प्रमुख देशांनी एकत्र येणे गरजेचे आहे.

५. दहशतवाद्यांना नायक बनविण्याचा प्रयत्न
सैन्याच्या उपस्थितीत होणारे अंत्यविधी म्हणजे दहशतवादी क्रियाकलापांना वैधता देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे युवकांमध्ये चुकीचा संदेश जातो की दहशतवादी मार्गावर गेले तरी सैन्य आणि सत्ता त्यांचा सन्मान करते. समाजात असा संदेश जात असेल तर ही खूप गंभीर बाब आहे.

6. दहशतवादाच्या इतिहासात पाकिस्तानचा सहभाग
FATF (Financial Action Task Force) ने पाकिस्तानला २०१८ ते २०२२ या काळात ग्रे लिस्टमध्ये टाकले होते, कारण तिथे आर्थिक व्यवहारांद्वारे दहशतवादी संघटनांना मदत होत असल्याचे स्पष्ट झाले होते. भारतात २००१ नंतर झालेल्या प्रमुख दहशतवादी हल्ल्यांपैकी ८०% हल्ल्यांमध्ये पाकिस्तानस्थित गटांचा सहभाग असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने नोंदवले आहे. २०२३ मध्ये UN Reports नुसार पाकिस्तानात सुमारे १२ सक्रिय दहशतवादी संघटना कार्यरत होत्या, त्यातील बहुतेकांना स्थानिक संरक्षण असल्याचे निदर्शनास आले.

दहशतवाद हा केवळ एका देशाचा प्रश्न राहिलेला नाही. पाकिस्तानसारख्या देशाचे लष्कर जर दहशतवाद्यांच्या अंत्यविधीत सहभागी होत असेल, तर ही जागतिक शांततेसाठी मोठी धोक्याची घंटा आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने केवळ निदर्शने न करता प्रत्यक्ष कठोर पावले उचलण्याची ही योग्य वेळ आहे.

😡😡 शर्मनाक !

आतंकवादी के अंतिम संस्कार में पाकिस्तानी सेना !

लश्कर के आतंकवादी "अब्दुल रऊफ" के अंतिम संस्कार में शामिल हुई पाकिस्तानी सेना !
.
सूत्र बता रहे हैं कि कई "डब्बे" बिल्कुल खाली थे, सुअरों के "मांस के लोथड़े" भी ना मिल पाए !
😡😡 pic.twitter.com/F580M6XGUH

— Er. Rajesh Singh (@Kumar1975Rajesh) May 7, 2025

Tags: BADI BAATIndian Army StrikeMasood AzharPakistan Terror Links
ShareTweetSendShare

Related News

पाकिस्तानच्या मस्तीवर भारताचा ‘सुदर्शन’ प्रहार
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानच्या मस्तीवर भारताचा ‘सुदर्शन’ प्रहार

भारताच्या हल्ल्यानंतर कराची शेअर बाजारात भूकंप; बाजार कोसळला
आंतरराष्ट्रीय

भारताच्या हल्ल्यानंतर कराची शेअर बाजारात भूकंप; बाजार कोसळला

ऑपरेशन सिंदूर : पहलगामचा बदला, पाकिस्तानात नऊ ठिकाणी भारताचा एअर स्ट्राईक
general

ऑपरेशन सिंदूर : पहलगामचा बदला, पाकिस्तानात नऊ ठिकाणी भारताचा एअर स्ट्राईक

१९९३ बॉम्ब स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी फारुख टकलाच्या अवैध कारवायांचा पर्दाफाश
आंतरराष्ट्रीय

१९९३ बॉम्ब स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी फारुख टकलाच्या अवैध कारवायांचा पर्दाफाश

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर
Latest News

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

Latest News

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे

पाकिस्तानच्या मस्तीवर भारताचा ‘सुदर्शन’ प्रहार

पाकिस्तानच्या मस्तीवर भारताचा ‘सुदर्शन’ प्रहार

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

युद्ध सुरु !! भारताकडून ‘लाहोर आणि इस्लामाबाद’वर हवाई हल्ला

युद्ध सुरु !! भारताकडून ‘लाहोर आणि इस्लामाबाद’वर हवाई हल्ला

पाकचं खोट चव्हाट्यावर! 7 बिनबुडाच्या दाव्यांची यादी समोर….

पाकचं खोट चव्हाट्यावर! 7 बिनबुडाच्या दाव्यांची यादी समोर….

चिन्मय कृष्ण दास यांना पुन्हा अटक; काय आहे कारण?

चिन्मय कृष्ण दास यांना पुन्हा अटक; काय आहे कारण?

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कोणती शस्त्रे वापरण्यात आली? वैशिष्ट्ये काय

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कोणती शस्त्रे वापरण्यात आली? वैशिष्ट्ये काय

‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही भारताने जपली नितीमत्ता

‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही भारताने जपली नितीमत्ता

…म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ती नऊ ठिकाणं उध्वस्त करण्यात आली

…म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ती नऊ ठिकाणं उध्वस्त करण्यात आली

दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणाऱ्या पाक लष्कराचा खरा चेहरा उघड

दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणाऱ्या पाक लष्कराचा खरा चेहरा उघड

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.