भारताने पुन्हा एकदा आपल्या लष्करी क्षमतेचे अचूक प्रदर्शन करत दहशतवादाविरोधात मोठा पाऊल उचलले आणि ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तान मधील नऊ दशतवादी स्थळांना उध्वस्त केले. पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतीय सैन्याकडून ७ एप्रिल रोजी पाकिस्तान विरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली.
भारतीय सशस्त्र दलांनी “ऑपरेशन सिंदूर” दहशतवादी तळांवर अचूक आणि नियोजित हल्ले करत पुन्हा एकदा भारतीय सैन्याची ताकद दाखवून दिली आहे. पाकिस्तानवर करण्यात आलेल्या एअरस्ट्राईकमध्ये प्रगतशील व तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या मिसाईचा वापर करण्यात आला होता. आजच्या या लेखात आपण भारताने पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी कोणत्या शस्त्राचा वापर केला होता? त्यांची खासियत काय आहे. याबद्दल जाणून घेणार आहोत.
स्कॅल्प क्रूज मिसाईल
स्कॅल्प क्रूझ क्षेपणास्त्र, ज्याला यूकेमध्ये स्टॉर्म शॅडो म्हणून ओळखले जाते. हवेतून हे क्षेपणास्त्र डागले जाते. शत्रूला चकवा देऊन (स्टेल्थ) मारा करण्यासाठी या क्षेपणास्त्रांची ओळख आहे. रात्री आणि सर्व प्रकारच्या वातावरणात या क्षेपणास्त्रांचा वापर शक्य असल्याने विविध देशांची संरक्षण दले या क्षेपणास्त्राला पसंती देतात. बंकर उद्ध्वस्त करण्यासाठी ही क्षेपणास्त्रे योग्य मानली जातात. युरोपियन डिफेन्स कंपनी एमबीडीएने याची निर्मिती केली आहे. भारताच्या ३६ राफेल विमानांचा हा भाग आहे. त्याचं पूर्ण नाव Système de Croisière Autonome à Longue Portée – Emploi Général आहे.
हॅमर मिसाईल
हॅमर मिसाईल, ज्याला AASM (Armement Air-Sol Modulaire) असेही म्हटले जाते, ही फ्रेंच संरक्षण कंपनी सफ्रानने विकसित केले आहे. हे कमी उंचीवरून हल्ला करण्यास सक्षम आहे, आणि शत्रूच्या रडारला चकमा देऊ शकते. स्कॅल्प आणि हॅमर या दोन्ही शस्त्रांनी भारतीय वायुसेनेला ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या टप्प्यात यश मिळवून दिले.
कामिकाझे ड्रोन
कामिकाझे ड्रोन, हे एक हवाई शस्त्र आहे जे ओळख पटल्यानंतर उच्च-प्रभावाच्या हल्ल्यासह लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
स्कॅल्प आणि हॅमर प्रमाणे, कामिकाझे ड्रोनचा वापर अचूक हल्ल्यांसाठी केला जातो.
ऑपरेशन सिंदूरची वैशिष्ट्ये ?
-पाकिस्तानच्या रडार यंत्रणेला कोणतीही भनक न लागू देता हा हल्ला केला.
-भारताला कारवाईत यश मिळाले. भारताने उध्वस्त केलेल्या दहशतवादी हल्ल्याची कबुली पाकिस्तानने दिली.
-फक्त पाकव्याप्त नाही तर पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणं देखील उध्वस्त केली.
-दहतवादी हल्ल्याची माहिती अचूक होती.
-नऊ दहशतवादी तळांमधील मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांचा खात्मा
-भारतीय हवाई हल्ल्यात एकाही नागरिकाला दुखापत नाही, कोणतेही नुकसान नाही.
-फक्त दहशतवादाविरोधात कारवाई.
ऑपरेशन सिंदूर कोणाविरुद्ध ?
ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरुद्ध होते. या ऑपरेशनने दहशतवाद्यांच्या मुळावर घाव घातला. कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही असा संदेश भारताने जगाला दिला. भारताच्या या ऑपरेशन अंतर्गत फक्त दहशतवादी स्थळांना लक्ष करण्यात आले. या कारवाईत पाकिस्तानच्या लष्करी स्थळांना स्पर्शही झाला नाही.