भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांना लक्ष करत नष्ट केले आहे. भारताची ही कारवाई यशस्वीरित्या पार पडली व भारताने केलेल्या या ऑपरेशनमध्ये कोणत्याही भारतीय सैन्याला दुखापत तसेच कोणत्याही लढाऊ विमानाचे नुकसान झालेले नाही. भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये जाऊन दहशतवादी तळ नष्ट करून सुरक्षितपणे पाकिस्तानमधून बाहेर आला. भारताच्या या कारवाईची पाकीस्तानला भनक देखील लागली नाही. पण पाकिस्तान मात्र, स्वतःच्या सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या त्रुटी झाकणाचा प्रयत्न करताना दिसला. पाकिस्तान सरकार सध्या पाकिस्तानी जनतेची दिशा भूल करत खोटे आणि बिनबुडाचे दावे करत आहे.
पाकिस्तानने भारताच्या तीन राफेल लढाऊ विमानांना पाडल्याचे दावे केले आहे. सोबतच अनेक आरोप केले आहेत. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानमध्ये एकच गोंधळ उडाला असून, पाकिस्तानी नागरिक सरकारच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. याचदरम्यान, पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी स्काय न्यूजवरील मुलाखतीदरम्यान असे काही दावे केले आहेत, जे ऐकून कोणाला हसू येईल. आजच्या या लेखात आपण याबद्दलच चर्चा करणार आहोत.
अत्ताउल्लाह तरार यांचा पहिला दावा : “आम्ही (पाकिस्तान) दहशतवादाविरुद्ध आघाडीवर असलेले राज्य आहोत.”
खरं तर दक्षिण आशियातील दहशतवादाला पाकिस्तान पाठींबा देते. हे जगजाहीर आहे. पाकिस्तान अतिरेकी गटांना, सुरक्षित आश्रयस्थान, लॉजिस्टिकल समर्थन आणि आर्थिक मदत पुरवतो हे सगळ्यांनाच ठाऊक आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये ५० हून अधिक सक्रिय दहशतवादी संघटना कार्यरत आहेत, त्यापैकी अनेकांचे थेट संबंध देशाच्या गुप्तचर संस्थेशी, म्हणजेच आयएसआयशी आहेत.
दावा: “पाकिस्तानने कधीही प्रथम हल्ला केलेला नाही.”
हा दावा खरं हसण्यासारखा आहे. व हा पाकिस्तनाच्या इतिहासाचा अपमान आहे. पाकिस्तान आधीपासूनच कोणत्याही हल्ल्याला नाकारत आलेला आहे. पाकिस्तानची हीच वृत्ती वर्षानुवर्षे पाहायला मिळाली आहे. आधी पाकिस्तान हल्ला करत आणि नंतर हात वरती करतो.
-आता हीच उदाहरणे घ्या जेव्हा पाकिस्तानने स्वतः १९४७-४८ मध्ये युद्ध केले होते. आदिवासी मिलिशिया आणि पाकिस्तानी सैन्याने काश्मीरवर केलेल्या आक्रमणामुळे 1947-48 मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झाले.
-१९६५ मध्ये, त्यांनी ऑपरेशन जिब्राल्टर सुरू केले, हजारो सैनिकांना नागरी वेशात काश्मीरमध्ये बंडखोरी भडकवण्यासाठी पाठवले. या कृत्यामुळे युद्ध झाले.
-१९९९ मध्ये, पाकिस्तानी सैन्याच्या नियमित सैनिकांनी शांततेच्या काळात भारतीय हद्दीत घुसखोरी करून कारगिल युद्ध सुरू झाले. पाकिस्तानने कायमच दक्षिण आशियातील सर्वात हिंसक संघर्षांमध्ये वारंवार प्रमुख आक्रमक म्हणून काम केले आहे.
दावा: “पाकिस्तानात कोणतेही दहशतवादी छावण्या नाहीत.”
-पण पाकिस्तानच्याच उच्च अधिकाऱ्यांचा नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात त्यांनी याला कबुली दिली आहे. गेल्या आठवड्यातच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी स्काय न्यूजवर कबूल केले होते की, पाकिस्तान दहशतवादी गटांना गेल्या अनेक दशकांपासून निधी आणि समर्थन देण्याचे काम करत आहे.
Pakistan's Defence Minister CONFESSES on record:
“We’ve been doing dirty work for the US, UK for three decades — including funding terror.”From exporting jihad to serving foreign masters — no shame left
This is not a slip
This is a confession#Pakistan #Terrorism #USA pic.twitter.com/j4VdvbAEsK
— Ritam English (@english_ritam) April 25, 2025
-दुसरीकडे माजी राष्ट्रपती आणि लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी यापूर्वीच जिहादी गटांचा वापर धोरणात्मक फायद्यासाठी करत असल्याचे काबुल केले आहे. विशेषतः भारताविरुद्ध केल्याचे कबूल केले होते.
बेनझीर भुट्टो आणि बिलावल भुट्टो यांनीही दहशतवादी घटकांना पोसण्यात देशाचा सहभाग असल्याचे मान्य केले आहे. या कबुलीजबाबांमुळे पाकिस्तानचे खोटा चेहरा समोर येतो.
दावा: “आम्ही जगात शांततेसाठी हमीदार आहोत. आम्ही दहशतवाद व जगामधील एक भिंत आहोत.”
त्यांचा हा दावा हास्यास्पद आहे. कारण जर पाकिस्तान भिंत असेल तर ती दहशतवाद्यांचे रक्षण करणारी भिंत आहे, जगाचे नाही. जग अजून हे विसरलेले नाही की ९/११ चा मुख्य सूत्रधार ओसामा बिन लादेन पाकिस्तानच्या सर्वोच्च लष्करी अकादमीपासून काहीच दूर अंतरावर अबोटाबादमध्ये लपलेला होता.
दावा: “ओसामा बिन लादेनला पाकिस्तान आश्रय देत नव्हता.”
पाकिस्तानचे माहिती मंत्री हे स्पष्टपणे नाकारण्याचे धाडस करतात जवळजवळ हास्यास्पदच आहे. ओसामा बिन लादेन पाकिस्तानी लष्करी तळाजवळील अबोटाबादमधील एका मजबूत तटबंदीच्या संकुलात आरामात राहत असल्याचे आढळले होते. तो कुठल्याही डोंगराळ भागात लपला नव्हता तर एका श्रीमंत परिसरातील एका मोठ्या आलिशान ठिकाणी राहत होता. त्याला ठार मारण्यासाठी अमेरिकेने केलेली कारवाई पाकिस्तानपासून लपवण्यात आली होती. यावरून अंदाज येतो की, अमेरिका पाकिस्तानवर किती विश्वास ठेवते.
दावा: “पाकिस्तानच्या मदतीशिवाय, दहशतवादाविरुद्ध सुरू असलेल्या कारवाया अयशस्वी झाल्या असत्या.”
पण याच्या उलट पाकिस्तानच्या मदतीमुळे दहशतवादी नेटवर्क फक्त वाढत आहेत कमी होत नाहीत. पाकिस्तान दीर्घकाळापासून दोन्ही बाजूंनी बोलत आला आहे. एकीकडे पाकिस्तानात दहशतवाद्यांना आश्रय देणे, प्रशिक्षण देणे, सुरूच आहे पण दुसरीकडे मात्र, जेव्हा हे दहशतवादी एखाद्या देशात जाऊन अशांतता पसरवण्याचे काम करतात तेव्हा पाकिस्तान आमचा या दशतवाद्यांशी काहीही संबंध नाही म्हणून हात वरती करताना दिसला आहे.
आता अत्ताउल्लाह तरार यांच्या हास्यास्पद दाव्यांनंतर पुन्हा एकदा पाकिस्तनाचा दुटप्पीपणाचा चेहरा समोर आला आहे.