Chinmoy Krishna Das: जेव्हापासून बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचे सरकार कोसळून मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार स्थापन झाले आहे, तेव्हापासून बांगलादेशमध्ये हिंदूवर सातत्याने हल्ले होत आहेत. या प्रकरणात हिंदू लोकांचा काहीही संबंध नसताना हिंदूंच्या घरे, व्यवसाय आणि प्रार्थनास्थळांवर हल्ले झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मोहम्मद युनूस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर बांगलादेशमधील सनातनी जागरण जोतचे प्रवक्ते आणि चितगाव येथील पुंडरिक धामचे माजी प्रमुख चिन्मय कृष्ण दास यांना देशद्रोहाच्या खोट्या आरोपाखाली नोव्हेंबर २०२४ मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल पाच महिने चिन्मय कृष्ण दास हे अटकेत होते. त्यांचा जामीन अर्ज जाणून बूजून नाकारला जात होता. त्यानंतर ३० एप्रिल २०२५ रोजी बांगलादेशी उच्च न्यायालयाने मोठा निकाल देत त्यांचा जामीन मंजूर केला होता. न्यायमूर्ती मोहम्मद अतोअर रहमान आणि न्यायमूर्ती मोहम्मद अली रेझा यांच्या खंडपीठाद्वारे हा आदेश देण्यात आला होता.
चिन्मय कृष्ण दास यांना पुन्हा अटकेचे आदेश का देण्यात आले आहेत:
३० एप्रिल रोजी जामीन मिळाल्यानंतर चिन्मय कृष्णा दास यांना अटकेपासून संरक्षण मिळाले होते. मात्र नुकतेच बांगलादेशमधील चितगाव न्यायालयाने आता पुन्हा एकदा चिन्मय कृष्ण दास यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. चितगाव न्यायालयाचे वकील सैफुल इस्लाम अलिफ यांच्या हत्येला चिन्मय कृष्ण दास यांना जबाबदार धरण्यात आले आहे.
🚨 SHOCKING & SHAMEFUL
After sedition, FOUR more cases slapped on Chinmoy Krishna Das — now includes MURDER CHARGE too.
Monk Jailed, Jihadis Free — Bangladesh Model…? pic.twitter.com/PCwhkF4Dnv
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) May 6, 2025
काय आहे वकील सैफुल इस्लाम अलिफ हत्या प्रकरण:
सैफुल इस्लाम उर्फ अलिफ हा चितगावमध्ये सहाय्यक सरकारी वकील होता. सैफुल इस्लाम अलिफची हत्या २६ नोव्हेंबर २०२४ रोजी झाली आहे. चिन्मय कृष्णा दास यांना अटक केल्यानंतर बांगलादेशी हिंदूंनी चिन्मय कृष्ण दास यांच्या सुटकेच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनादरम्यान वकील सैफुल इस्लाम अलिफ यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला होता. त्यामुळे बांगलादेशने या हत्येस चिन्मय कृष्ण दास यांना आणि त्यांच्या अनुयानींना जबाबदार धरले आहे. परंतु याबाबत अद्याप कोणतेही ठोस पुरावे बांगलादेश न्यायालयाकडे नाहीत. तसेच चिन्मय कृष्णादास यांच्या समर्थकांनी या आरोपाला फेटाळून लावले आहे. या प्रकरणी इतर २१ जण अजूनही तुरूंगात आहेत.
चिन्मय कृष्णा दास यांना का अटक करण्यात आली होती:
गतवर्षी वर्षी बांगलादेशमध्ये झालेल्या जनआंदोलनात शेख हसीना सरकार पडले. त्यानंतर बांगलादेशात मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार स्थापन झाले. त्यानंतर बांगलादेशमध्ये हिंदूवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होऊ लागले होते. चिन्मय कृष्ण दास यांनी हिंदू आणि अल्पसंख्याकांवर होणाऱ्या वाढत्या छळाविरुद्ध सक्रियपणे निषेध केला होता. याचाच रोष ठेवून बांगलादेश सरकारने बांगलादेशच्या राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केल्याच्या खोट्या आरोपाखाली चट्टोग्राममध्ये त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल केला आणि त्यांना अटक केली होती.
बांगलादेशात चिन्मय कृष्ण दास यांच्यावर अन्याय:
कायदेशीर वकिल मिळवणे हा कोणात्याही व्यक्तीचा न्यायिक हक्क आहे. मात्र चिन्मय कृष्ण दास यांना देशद्रोहाच्या नावाखाली अटक करण्यात आल्यानंतर त्यांना साधा वकिल सुद्धा मिळत नव्हता. काही काळानंतर त्यांना वकिल मिळाल्यानंतर तो वकिल सुणावणीला पोहचण्याआधीच त्या वकिलावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता, हे साऱ्या जगाने पाहिले आहे. तसेच तेथील वकिलांना चिन्मय कृष्ण दास यांची केस लढू नये, यासाठी दबाव टाकण्यात आला होता. तसेच अनेकदा त्यांचे जामीन अर्ज जाणून बुजून फेटाळण्यात आल्याचा दावा बांगलादेशातील हिंदू संघटना करत आहेत.
चिन्मय कृष्ण दास कोण आहेत?
चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांचे खरे नाव चंदन कुमार धर आहे. ते बांगलादेशमधील चितगाव येथील इस्कॉनचे प्रमुख आहेत. शेख हसीना सरकार कोसळल्यानंतर हिंदूंविरुद्ध मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडत असताना त्यांनी बांगलादेशी हिंदू आणि अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ‘सनातन जागरण मंच’ स्थापना करण्यात आली. त्यानंतर चिन्मय प्रभू त्याचे प्रवक्ता बनले होते. मात्र त्यानंतर अल्पावधीतच त्यांना बांगलादेश सरकारने देशद्रोहाच्या नावाखाली अटक केली होती. या प्रकरणी ३० एप्रिल रोजी त्यांना जामीन मिळाला होता मात्र पुन्हा एकदा वकिलाच्या हत्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आल्याने हिंदू संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.