पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्यानंतर भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर देत ७ एप्रिल रोजी पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना नष्ट केले होते. भारतीय सैन्याच्या कारवाईत फक्त दहशतवादी ठिकाणांवरच निशाणा साधण्यात आला होता. सामान्य नागरिक तसेच पाकिस्तानच्या लष्कराला धक्का देखील लावण्यात आला नव्हता.
पण पाकिस्तानी सैन्याने मात्र, भारताच्या कारवाईला उत्तर देत पंजाब, राजस्थान आणि जम्मूमध्ये हल्ला करत सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ केला. पाकिस्तानच्या याच क्रूर कारवाईनंतर आता भारताने पाकिस्तान विरुद्ध युद्ध सुरु केले आहे.
भारताने रात्री नऊच्या सुमारास पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देत प्राणघातक कारवाई केली आहे. भारताने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आणि लाहोरमध्ये हवाई हल्ले सुरु केले आहेत.
पाकिस्तानच्या चिथावणीखोर कृतींना उत्तर देत भारताने हवाई हल्ले सुरु करत योग्य उत्तर दिले आहेत. भारताकडून पाकिस्तानच्या दिशेने अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात विनाश झाल्याचे सांगितले जात आहे.