पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारताच्या सीमेजवळील ३ राज्यांमध्ये ड्रोन हल्ले केल्यानंतर आता भारतीय सैन्याने जोरदार पलटवार केला आहे. भारताने रात्री नऊच्या सुमारास पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देत प्राणघातक कारवाई केली आहे. भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ले सुरु केले आहेत.
एकीकडे ड्रोन हल्ला सुरू असताना भारतीय नौदलाने कराची बंदरावर जोरदार हल्ला केला आहे. नौदलाच्या तुफान हल्ल्यामुळे कराची बंदर उद्धवस्त झाले आहे.
भारतीय नौदलाने कराची बंदरावर अनेक क्षेपणास्त्रे डागली या हल्ल्यांमध्ये कराची बंदर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय नौदलाने आधीच अरबी समुद्रात आयएनएस विक्रांत तैनात केले होते.
भारताच्या तिन्ही सैन्याने एकत्रितपणे प्रथम पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानने युद्धाचा निर्णय घेतला, ज्याला भारतीय सैन्य योग्य उत्तर देत आहे.
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद, लाहोर आणि सियालकोट मध्ये भारतीय सैन्यांने हवाई हल्ले सुरु केले आहेत. इस्लामाबादच्या प्रमुख चौकांमध्ये आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पसरलेले दिसत आहेत.