Donald Trump: भारत पाकिस्तानने १० मे रोज शस्त्रसंधीला मान्यता दिली आहे. .मात्र या दोन्ही देशातील तणावाच्या काळात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच एक महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, मी भारत पाकिस्तानला सांगितले होते की, “जर युद्ध थांबवले नाही तर आम्ही तुमच्यासोबतचा व्यापार थांबवू. त्यामुळे भारत पाकिस्तानने शस्त्रसंधी स्विकारली.”
यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे भारतासह जगभरात खळबळ उडाली आहे. मग डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यात कितपत तथ्य आहे आणि भारत अमेरिकेचे व्यापार संबंध नेमके कसे आहेत, याचा सविस्तर आढावा आपण घेऊयात.
खरेतर भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी १३ मे रोजी पत्रकार परिषद घेत ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर भारताची भूमिका स्पष्ट केली आणि ट्रम्प यांचे दावे फेटाळले आहेत. जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान भारत सातत्याने अमेरिकेच्या संपर्कात होता, अमेरिकेशी चर्चा होत होती. परंतु अमेरिकेशी व्यापाराबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या दाव्यात फारसे तथ्य नसल्याचे सुरवातीलाच समोर आले आहे.
भारत अमेरिकेमध्ये काय आयात-निर्यात होते :
-भारत अमेरिकेला निर्यात करणाऱ्या गोष्टींमध्ये प्रामुख्याने पॅकेज्ड मेडिसिन, सिस्टिक फायब्रोसिस औषधे, अँटीबायोटिक्स
हिरे, मौल्यवान धातू, मोती तयार कपडे, टेक्सटाइल, मशीनरी, उपकरणे, इलेक्ट्रिकल उपकरणे फळे, भाज्या, मसाले इत्यांदीचा समावेश आहे,
-तर भारत अमेरिकेकडून आयात करणाऱ्या गोष्टींमध्ये कच्चे तेल, पेट्रोलियम उत्पादने, कोळसा ब्रिकेट, गॅस टर्बाइन, मशीनरी
विमानाचे सुटे भाग, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, संगणक घटक औषधे, वैद्यकीय उपकरणे रसायने इत्यादींचा समावेश आहे.
भारत अमेरिका व्यापार संबंध गेल्या अनेक वर्षांपासून खूप मजबूत असल्याचे पाहायला मिळते.
अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश मानला जातो .
-उपलब्ध माहितीनुसार दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय व्यापार 190.08 अब्ज अमेरिकन डॉलर इतका झाला होता.
-यामध्ये भारताने निर्यात अमेरिकेला केलेली निर्यात 83.77 अब्ज डॉलर होती तर भारताने अमेरिकेकडून केलेली आयात 40.12 अब्ज डॉलर इतकी होती.
उपलब्ध माहितीनुसार, २०२३ या वर्षी अमेरिकेने भारतातून सर्वात जास्त पॅकेज्ड औषधे खरेदी केली होती. या पॅकेज्ड औषधांची किंमत १०. ४ अब्ज डाॅलर्स होती.
* या आकडेवारी स्पष्ट करतात की, भारत अमेरिकेला जास्त निर्यात करतो तर अमेरिकेकडून भारताला आयात कमी होते.
* अर्थातच भारताच्या एकूण परकीय व्यापारात अमेरिका हा त्याचा सर्वात मोठा भागीदार आहे. यासाठी आणखी काही आकडेवारी पाहायची झाल्यास २०२४ मध्ये भारत आणि अमेरिकेतील एकूण व्यापार १२९.२ अब्ज डॉलर्स होता. तर याच काळात भारताचा चीनसोबतचा एकूण व्यापार ११८ डाॅलर अब्ज आहे.
व्यापारात अमेरिका भारताचा कितवा भागीदार आहे:
-अमेरिकेचा सर्वात मोठा व्यावसायिक भागीदार मेक्सिको आहे. त्यानंतर कॅनडा आणि चीनचा क्रमांक लागतो. या यादीत भारत १० व्या क्रमांकावर आहे.
अमेरिकेसाठी भारतासोबतचा व्यापार कसा महत्वाचा आहे :
-भारत अमेरिकेला मोठ्याप्रमाणात निर्यात करत असला तरी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी भारतासोबतचा व्यापार खूप महत्त्वाचा आहे. कारण भारतातून आयात होणाऱ्या उत्पादनांमुळे अमेरिकेत रोजगाराची निर्मिती होते.
-अमेरिकेसाठी भारत एक मोठी बाजारपेठ, उत्पादने आणि गुंतवणुकीचे केंद्र आहे.
भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेमुळे अमेरिकेला जागतिक व्यापार आणि आर्थिक संबंध सुधारण्यास मदत होते.
या सगळ्या मुद्यांच्या आधारे हे स्पष्ट होते की ट्रम्प त्यांच्या वक्तव्यातून हे दाखवू इच्छित असले की, भारतासाठी अमेरिकेसोबतचा व्यापार किती महत्वााच आहे तरी अमेरिकेसाठीही भारत व्यापाराच्या दृष्टिकोणातून जास्त महत्वाचा आहे हे सहज लक्षात येते. त्यामुळे साहजिकच अमेरिकेलाही भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडणे परवडणारे नाही, हे स्पष्ट होते.