Friday, May 9, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home इतिहास,संस्कृती

तेथे कर माझे जुळती ; अहिल्याबाई होळकर जयंती

param by param
May 31, 2024, 05:46 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

जया वेळी देशात आपत्ती आल्या तुवा युक्तीने बुद्धीने दूर केल्या तुझे दिव्य सामर्थ्य राष्ट्र आधार नमस्कार हे नारीशक्ती त्रिवार।।

पुरातन काळापासुन आपण बघितले तर वरील श्लोकाच्या चारोळी म्हणजेच राष्ट्र उद्धारासाठी स्त्रीने तिच्या बुद्धी चातुर्याने केलेले प्रयत्न हे फलद्रूप होऊन राष्ट्र उभारण्यासाठी स्त्रीने केलेले योगदान होय.

अशीच एक स्त्री जिने आपल्या राज्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण केले ती म्हणजे *अहिल्याबाई होळकर* अहिल्याबाईंचे जीवन म्हणजे अग्निदिव्यच होते घरगुती, राजकीय, सामाजिक दुःख आणि संकटांना सामोरे जाऊन कर्तव्याचा कर्मयोग त्यांनी साधला. एक कर्तव्य कठोर मुत्सद्दी प्रजावत्सल राजकारणी म्हणून आजही त्यांचा गौरव होतो.

अहिल्येचा विवाह सुभेदार मल्हारराव होळकर यांचा पुत्र खंडेराव यांच्याशी झाला. खंडेराव हे कर्तृत्ववान नव्हते पण अहिल्याबाई आपले सासरे मल्हारराव होळकर व सासुबाई गौतमाबाई यांच्या मार्गदर्शनाखाली आपोआप संस्कारित होत होत्या. कुंभेरीच्या युद्धात 1754 ला खंडेराव यांना गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला पण सासरे मंल्हारराव होळकर यांनी अहिल्याबाईंना सती जाण्यापासून परावृत्त केले 

“संपूर्ण इंदौर  संस्थांनाची धुरा सुनबाई आता तुमच्या खांद्यावर आहे” हे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना पटवून दिले. मल्हाररावांच्या पश्चात मालेराव हे संस्थानचे अधिकारी बनले. पण मालेराव अल्पायुषी ठरले आणि मग इंदौरचा  पूर्ण कारभार अहिल्याबाई यांच्या हाती आला एक अत्यंत कुशल राज्यकारभार करणारी राणी म्हणून नावलौकिक मिळवला अहिल्याबाईंच व्यक्तिमत्व म्हणजे जणू एक विद्यापीठ आहे.

परमेश्वरावर निस्सिम भक्ती
अत्यंत कुशल नेतृत्व
पैशाचे व्यवहार अगदीच चोख
भारतातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला.

अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या नद्यांवरती घाट बांधले. रस्त्याच्या दुतर्फा वड, पिंपळ, औदुंबर, चिंच ,कडुनिंब अशा वृक्षांची लागवड केली या वृक्षांना धार्मिक महत्त्व असल्यामुळे हे वृक्ष आपोआप जतन केले जातील आणि पर्यावरणाचा तोल राखला जाईल एवढा उदात्त दूरदर्शी विचार अहिल्याबाईंनी केला.

बारा ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी भरपूर दानधर्म करून अन्नछत्र उभारले.  त्या वेळेला इंदौर  संस्थान कडे ज्यांनी कोणी वाकडा दृष्टीक्षेप टाकला तेव्हा स्वतः तलवार घेऊन रणांगणावरती उभ्या राहिल्या.

त्यांनी 28 वर्ष कारभार केला अहिल्याबाई करारी होत्या शिस्तप्रिय होत्या. पण तितक्याच सात्विक होत्या त्यांचं धर्माचरण अगदी सचोटीचं होते त्यांचे समाजकारण आणि राजकारण न्यायाधिष्ठित परिपूर्ण होते .  त्यांच्या पराक्रमाने त्यांनी स्वतःचा दरारा निर्माण केला होता. संपूर्ण इंदौर संस्थानांमध्ये त्यांच्या प्रति अत्यंत आदरयुक्त भावना होती. अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या अहिल्याबाई असामान्य कर्तृत्वाने इंदोरच्या संस्थानाच्या महाराणी झाल्या. आणि इंदौर संस्थांनमध्ये त्यांचे कर्तृत्व सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले. 

जिने संतती मानले स्व प्रजेला*
जिने सौख्य सोयी दिल्या भारताला*
जरी दुःखीता तृप्ती देई दुजाला*
*नमस्कार माझा अहिल्या सतीला*

प्रेरणा जोशी , नाशिक

सौजन्य -समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत 

Tags: ahilyabai holkarbirth anniversaryindore
ShareTweetSendShare

Related News

नितीन गडकरींची नवी संकल्पना,गाड्यांच्या हॉर्नमधून ऐकायला येणार भारतीय वाद्यांचा आवाज
Latest News

नितीन गडकरींची नवी संकल्पना,गाड्यांच्या हॉर्नमधून ऐकायला येणार भारतीय वाद्यांचा आवाज

अयोध्येतील राम मंदिराच्या मुख्य शिखरावर कलशाची प्रतिष्ठापना, बांधकाम वेगात सुरू
Latest News

अयोध्येतील राम मंदिराच्या मुख्य शिखरावर कलशाची प्रतिष्ठापना, बांधकाम वेगात सुरू

रशियाचा युक्रेनवर भीषण हल्ला; 21 जणांचा मृत्यू
Latest News

रशियाचा युक्रेनवर भीषण हल्ला; 21 जणांचा मृत्यू

फडणवीस आणि वैष्णव यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेनची घोषणा,  १० दिवसांची खास रेल्वे टूर!
Latest News

फडणवीस आणि वैष्णव यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेनची घोषणा, १० दिवसांची खास रेल्वे टूर!

गरीबांच्या हक्कासाठी नवीन आधार प्रणाली – केंद्र सरकारचा नवीन उपक्रम
कायदा

गरीबांच्या हक्कासाठी नवीन आधार प्रणाली – केंद्र सरकारचा नवीन उपक्रम

Latest News

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

युद्ध सुरु !! भारताकडून ‘लाहोर आणि इस्लामाबाद’वर हवाई हल्ला

युद्ध सुरु !! भारताकडून ‘लाहोर आणि इस्लामाबाद’वर हवाई हल्ला

पाकचं खोट चव्हाट्यावर! 7 बिनबुडाच्या दाव्यांची यादी समोर….

पाकचं खोट चव्हाट्यावर! 7 बिनबुडाच्या दाव्यांची यादी समोर….

चिन्मय कृष्ण दास यांना पुन्हा अटक; काय आहे कारण?

चिन्मय कृष्ण दास यांना पुन्हा अटक; काय आहे कारण?

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कोणती शस्त्रे वापरण्यात आली? वैशिष्ट्ये काय

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कोणती शस्त्रे वापरण्यात आली? वैशिष्ट्ये काय

‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही भारताने जपली नितीमत्ता

‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही भारताने जपली नितीमत्ता

…म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ती नऊ ठिकाणं उध्वस्त करण्यात आली

…म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ती नऊ ठिकाणं उध्वस्त करण्यात आली

दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणाऱ्या पाक लष्कराचा खरा चेहरा उघड

दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणाऱ्या पाक लष्कराचा खरा चेहरा उघड

ऑपरेशन सिंदूरसाठी वापरलेली ‘प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टीम’ काय आहे?

ऑपरेशन सिंदूरसाठी वापरलेली ‘प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टीम’ काय आहे?

ऑपरेशन सिंदूर नंतर शरद पवारांकडून केंद्र सरकारचे कौतुक

ऑपरेशन सिंदूर नंतर शरद पवारांकडून केंद्र सरकारचे कौतुक

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.