CM Yogi Aditynath : लोकसभा निवडणूक 2024 चा आज (1 जून) शेवटचा म्हणजेत सातवा टप्पा आहे. आजच्या या शेवटच्या टप्प्यात सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या एकूण 57 जागांसाठी मतदान होत आहे.
आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेसह अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी मतदान करण्यासाठी मतदाना केंद्रावर पोहोचत आहेत. यामध्ये आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमधील गोरखनाथ येथील मतदान केंद्रावर मतदान केले आहे. गोरखपूरच्या लोकसभेच्या जागेवर बसपते जावेद अश्रफ, भाजपचे रवी किशन आणि सपाच्या काजल निषाद यांच्यामध्ये लढत होत आहे.