भारतातील आलेल्या विदेशी अधिकाऱ्यांनी आज परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि परराष्ट्र मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला.आणि योगासनांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
भारतातील युनायटेड किंगडमच्या उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन(Lindy Cameron) योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे यावर भर देत म्हणाल्या की, “योग सत्रात सहभागी झाल्याबद्दल मला आनंद होतो आहे तसेच दिल्लीत राहणे आणि एस जयशंकर आणि इतर विदेशी अधिकाऱ्यांसोबत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाभ्यास करायला मिळणे हा विलक्षण अनुभव होता”.
ब्रिटीश उपउच्चायुक्त क्रिस्टीना स्कॉट (Christina Martha Elena Scott) यांनी म्हंटले आहे की ,”जयशंकर आणि परदेशातून आलेल्या आपल्याबरोबरच्या विविध अधिकाऱ्यांमध्ये सामील होणे आणि श्रीनगरमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकणे हा एक विशेष अनुभव होता.तसेच ब्रिटीश उच्चायुक्तालय ही जगाला भारताची भेट आहे आणि आज येथे आल्याचा खरा आनंद झाला”.
भारतातील नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टेनर ( May-Elin Stener) “मला योगा आवडतो” यावर जोर देत म्हणाल्या की, “योग सराव खूप छान होता. मला योग दिनानिमित्त श्वासोच्छवासाबद्दल नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा. हा 10वा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. मी त्यात सहभागी झालो होतो याचा मला अभिमान आहे.
भारतातील संयुक्त राष्ट्रांचे निवासी समन्वयक शॉम्बी शार्प (Shombi Sharp) म्हणाले की, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त येथे एक अद्भुत सकाळ उत्साहवर्धक होती.या योग दिनाची सुरवात पंतप्रधानांनी न्यूयॉर्कमध्ये १० वर्षांपूर्वी केली होती.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शुक्रवारी राष्ट्रीय राजधानीत आपल्या विदेशातून आलेल्या मुत्सद्द्यांसोबत योगासन केले आणि सांगितले की “आंतरराष्ट्रीय संबंध निर्माण करताना योग हे एक चांगले निमित्त असू शकते. तसेच आज परराष्ट्र मंत्रालयातील अनेक मुत्सद्दी, राजदूत आणि सहकाऱ्यांना योग सत्रात सामील होताना पाहून मला खूप आनंद झाला.”
एक्स वर जयशंकर म्हणाले की जगभरात योग उत्साह आणि जागरूकता विकसित करणे ही एक प्रेरणा आहे. “आज सकाळी नवी दिल्लीतील #IDY2024 कार्यक्रमात राजनयिक समुदायाच्या सदस्यांसह भाग घेतला. जगभरात योगाचा उत्साह आणि जागरुकता विकसित करणे ही एक प्रेरणा आहे. #YogaforSelfAndSociety हा अनेकांसाठी जीवनाचा एक आवश्यक मार्ग बनला आहे हे पाहून आनंद झाला,” असे ते आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
राजनैतिक भेटीगाठी आणि भारतीय दूतावास यांच्यावतीने आज जीवनात योगाचे महत्त्व आणि फायदे याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी योग सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.