महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळितपणे सुरु झाली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी पुढीलप्रमाणे –
कोकण पदवीधर मतदारसंघ एकूण मतदार संख्या २,२३,४०८ असून मतदान केलेल्यांची संख्या ४५०१० इतकी आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी २०. १५ इतकी आहे.
मुंबई पदवीधर मतदारसंघ एकूण मतदार संख्या १,२०,७७१ असून मतदान केलेल्यांची संख्या ३२ ,६२२ इतकी आहे.सकाळी अकरा वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी २७.०१ इतकी आहे
मुंबई शिक्षक मतदारसंघ एकूण मतदार संख्या १५८३९ असून मतदान केलेल्यांची संख्या २,९०० इतकी आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी १८. ३0 इतकी आहे
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ एकूण मतदार संख्या ६९३६८ असून मतदान केलेल्यांची संख्या १६ ,०७९ इतकी आहे.सकाळी अकरा वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी २३ .१६ इतकी आहे.