काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वर्षा बंगल्यावर बैठक झाल्याचे समजते आहे. रात्री उशिरापर्यंत ही बैठक चालू होती. या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समजते आहे. उद्यापासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. राज्यपालनियुक्त विधानपरिषद सदस्य, मंत्रिमंडळ विस्तार व आगामी विधानसभा निवडणूक यावर चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.
उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. याला प्रत्युत्तर कसे द्यायचे यावर देखील चर्चा झाल्याची शक्यता आहे. काल रात्री उशिरा तब्बल तास ते दीड तास ही बैठक झाली आहे. या चर्चेत आगामी विधानसभा निवडणुकांबाबत देखील चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याआधी विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी ११ जागांवर महायुतीचे अनेक जण इच्छुक आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्र भाजपामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीनानंतर या सर्व गोष्टींची दखल पक्षश्रेष्ठीनी घेतली असून, अश्विनी वैष्णव आणि भूपेंद्र यादव यांची महाराष्ट्र राज्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे लोकसभेतील चुका टाळण्यासाठी भाजप सावधगिरी बाळगताना दिसत आहे.