प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पदुकोण या तगड्या स्टारकास्टचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘कल्की 2898 एडी’ अखेर आज 27 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी केलेल्या आगाऊ बुकिंगला उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
‘कल्की 2898 एडी’ हा या वर्षातील सर्वात मोठा बिगबजेट चित्रपट आहे.’कल्की 2898 एडी’ हा नाग अश्विन यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला एक मोठा मल्टीस्टारर चित्रपट आहे. संपूर्ण भारतीय प्रेक्षकांना लक्षात घेऊन बनवलेला हा चित्रपट त्याच्या नेत्रदीपक VFX, CGI इफेक्ट्ससाठी खूप चर्चेत आहे. प्रभासचा चित्रपट पहिल्याच दिवशी 100 कोटींहून अधिक कमाई करू शकतो, अशी अपेक्षा आहे. या चित्रपटावर 600 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
‘कल्की 2898 एडी’ बाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता असतानाच दुसरीकडे त्याच्या OTT रिलीजबाबत माहिती समोर आली आहे. ‘कल्की 2898 एडी’ ची हिंदी आवृत्ती OTT वर रिलीज होणार आहे. ‘कल्की 2898 एडी’चे हिंदी ओटीटी हक्क नेटफ्लिक्सने 175 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत.
सध्याच्या चर्चेनुसार, चित्रपटाच्या थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी नेटफ्लिक्सवर प्रीमियर होऊ शकतो. ऑगस्टच्या अखेरीस हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मात्र, चित्रपटाची अधिकृत OTT रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नाही.
‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट तेलगू, हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या 5 भाषांमध्ये जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला CBFC (सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन) ने UA प्रमाणपत्र दिले आहे. तसेच, चित्रपटाच्या सुरुवातीला व्हॉईस ओव्हरमध्ये चित्रपटाचा आशय काल्पनिक असल्याचे डिस्क्लेमर देण्यात आले आहे. चित्रपटाचा कालावधी 3 तासांचा आहे.