सुपर ८ च्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर टीम इंडिया आज सेमीफायनाचा सामना खेळणार आहे. इंग्लंड विरुद्ध आजचा सेमीफायनल सामना होणार आहे. २०२२ मधील उसने फेडण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. तसेच इंग्लंडदेखील फायनलमध्ये जाण्याच्या इर्षेने मैदानात उतरेल यात शंका नाही. आजच्या सामन्यासाठी भारतीय चाहते अतिशय आतुरतेने वाट बघत आहेत. मात्र आजच्या सेमीफायनल सामन्यावर पावसाचे संकट कायम आहे.
इंडिया आणि इंग्लंड यांचा संघ मजबूत संघ असल्याचे म्हटले जात आहे. दोन्ही संघाकडे अनुभवी फलंदाज, गोलंदाज आहेत. दोन्ही संघाच्या फिरकी गोलंदाजानी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे आजच्या सामन्याची फिरकीपटुंवर असणार आहे. तर फलंदाजीबाबत बोलायचे झाल्यास इंडियाकडे रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, विराट कोहली असे मजबूत फलंदाज आहेत. तर इंग्लंडची मदार खास करून जॉस बटलरवर असणार आहे.
मात्र आजच्या सामन्यावर पावसाचे संकट कायम आहे. तसेच या मैदानाची खेळपट्टी कशी आहे याचाही अंदाज बांधणे कठीण आहे. दरम्यान आजच्या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला नसून, काहीसा वेळ जास्तीचा देण्यात आला आहे . जर का हा सामना पावसामुळे रद्द झाल्यास भारत हा सध्या पहिल्या नंबरवर असल्याने त्यांचा फायनलमध्ये प्रवेश नक्की समजला जात आहे.