लोकसभेच्या अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. दरम्यान आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकसभेतील सदस्यांना संबोधित केले. आजच्या दिवसाची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने झाली. यावेळी राष्ट्रपती द्रुपदी मुर्मू यांनी आपल्या अभिभाषणात अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. देशातील जनतेने तिसऱ्यांदा मोदी सरकारला स्पष्ट बहुमत दिले आहे. तसेच २२ जुलै रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सुधारणांचा वेग वाढवला जाईल. गुंतवणुकीसाठी राज्यांमध्ये निरोगी स्पर्धा असली पाहिजे, असे अनेक मुद्दे राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात मांडले.
लोकसभेच्या अधिवेशनाच्या अभिभाषणात बोटाना राष्ट्रपती द्रुपदी मुर्मू यांनी अर्थसंकल्पावर भाष्य केले. यावेळी त्या म्हणाल्या, ”सरकारद्वारे मांडले जाणारे बजेट हे भविष्यातील विकासासाठी फायदेशीर ठरेल. या बजेटमध्ये अनेक आर्थिक आणि सामाजिक निर्णय घेतले जातील अणे ऐतिहासिक पावले उचलली जातील. भारत अर्थव्यवस्था जगातील सर्वात मोठी ५ वी अर्थव्यवस्था बनली आहे. गेल्या 10 वर्षांत सामान्य कालावधी नसतानाही, सरासरी 8 टक्के वाढ नोंदवली गेली. जागतिक महामारी आणि जगाच्या विविध भागात संघर्ष असतानाही हा विकास दर गाठला गेला. माझे सरकार भारत जगातील तिसऱ्या क्रमांकांची अर्थव्यवस्था होण्यासाठी प्रयत्न करत आहे.”
तसेच पुढे बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, ”संपूर्ण जग भारतात झालेल्या निवडणुकीची चर्चा करत आहे. देशात ६० वर्षानंतर एकच सरकार सलग तिसऱ्यांदा पूर्ण बहुमताने सत्तेत आले आहे. जनतेने या सरकारवर विश्वास दाखवला आहे. १८ वी लोकसभा ही अनेक घटनांमुळे ऐतिहासिक बनली आहे. ही लोकसभा संविधानाला ५६ वर्षे पूर्ण होताना साक्षी असणार आहे.”