सध्या राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प मांडला. यंदाचे पावसाळी अधिवेशन हे वादळी ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान अजित पवार यांनी मध्य प्रदेशच्या धर्तीवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात जाहीर केली आहे. शेतकरी, दुरबा घटक, महिला , युवक अर्थात समाजातील सर्वच घटकांसाठी काही ना काही तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
महिलांसाठी काय असणार?
१. मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा
२. ८ लाख उत्पन्न असणाऱ्या तसेच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना १०० टक्के शुल्क माफ केले जाणार
३. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा- वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्यात येणार
४. यावर्षी २५ लाख महिलांना लखपती बनविण्याचा शासनाचा विचार
शेतकऱ्यांसाठी काय असणार?
१. शेतकऱ्यांना एक रुपयात विमा योजना कायम ठेवणार.
२. कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हेक्टरच्या प्रति हेक्टर पाच हजारांचे अनुदान
३. मागेल त्याला सौरपंप मिळणार
४. १० हजार विद्यावेतन मिळणार
५. शेती कृषी पंपाचे वीजबिल माफ करणार
वारकऱ्यांसाठी काय?
१. प्रत्येक वरील २० हजारांची मदत करणार
२. प्रति दिंडी २० हजार रुपये दिले जाणार
३. सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार
४. मोफत औषधोपचार केले जाणार