आज आळंदीमधून संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. देहू व आळंदीमध्ये पांडुरंगाच्या जयघोषाने वातावरण प्रसन्न झाले आहे. आळंदीमधून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी देखील प्रस्थान करार आहे. यानिमित्त आळंदीत वारकऱ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. इंद्रायणी काठी वारकऱ्यांनी एकच गर्दी केली आहे. सगळीकडे भजन, गजर सुरु आहे. देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरकडे झाले आहे.
आळंदीत इंद्रायणी काठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सगळीकडे वारकऱ्यांची लगबग पाहायला मिळत आहे. या सोहळ्याचे नियोजन पंचायत समिती, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि प्रशासनाकडून पूर्ण झाले आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. वारकरी आता पालखीसोबत पंढपूरकडे जाणार आहेत.
आळंदीमध्ये वारकरी खांद्यावर भगवी पताका घेऊन, टाळ मृदुगाचा गजर, माऊलीनामाचा गजर करत पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. ३० आणि १ जुलै रोजी ज्ञानेश्वर माउली यांची पालखी पुण्यनगरीत मुक्कामी असणार आहे. आज दुपारी ४ ते ६ वाजण्याच्या सुमारास पालखी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. राज्यातील अनेक ठिकाणांवरून अनेक दिंड्या आळंदीत दाखल झाले आहेत.